प्रतिनिधी
नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिककर सज्ज झाले असताना नववर्ष स्वागत समितीने आपल्या आधी रद्द केलेल्या कार्यक्रमाच्या नव्या तारखांची घोषणा केली आहे. New Year Welcome Committee announces new dates for events
30 मार्च 2022 रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तालया मार्फत नववर्ष स्वागत समिती सदस्यांना पोलीस आयुक्तांनी भेटीसाठी बोलवले होते, त्यात नववर्ष स्वागत समिती आणि पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत, मधल्या काळात झालेले सर्व समज – गैरसमज दूर झाले. 31 मार्च रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तांमार्फत स्वागत समितीला सर्व कार्यक्रमांसाठी परवानगी देण्यात आली.
परंतु समिती मार्फत आधीच सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे स्वागत यात्रा वगळता इतर कार्यक्रमांसाठी हातात वेळ देखील शिल्लक नसल्याने, नववर्ष स्वागत समिती तर्फे माननीय पोलीस आयुक्तांकडे रद्द झालेल्या कार्यक्रमांसाठी पुन्हा एकदा नवीन तारखांसह हे सर्व कार्यक्रम करण्याची परवानगी मागितलील असता पोलिसांनी परवानगी दिली आहे. म्हणून नववर्ष स्वागत समिती तर्फे हा कार्यक्रम पुन्हा एकदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिनांक २ तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी शहरातील प्रमुख चौकात आणि प्रमुख मंदिरांमध्ये गुढी उभारून त्याचे पूजन होणार आहे.
– शुक्रवार १५ एप्रिल २०२२ रोजी अंतर्नाद
– शनिवार १६ एप्रिल २०२२ रोजी महावादन
– रविवार १७ एप्रिल २०२२ रोजी महारांगोळी या तीन नवीन तारखांना सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत, पाडवा पटांगण (जुने भाजी पटांगण), गोदाघाट, पंचवटी , नाशिक याठिकाणी कार्यक्रम करण्याची अधिकृत घोषणा या ठिकाणी नववर्ष स्वागत समितीने केली आहे.
हे सर्व घडवून आणण्यासाठी महावादनातील सर्व सहभागी वादक, अंतर्नाद मधील सर्व गुरु व सर्व शिष्य आणि त्यांचे पालक, महारांगोळीच्या सर्व सहभागी महिला, स्वयंसेवक, वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व माध्यम प्रतिनिधी आणि सर्व नाशिककर व माननीय पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय अशा सर्वांच्या प्रयत्नांना अखेर यश प्राप्त झाले आहे. नववर्ष स्वागत समितीने यासाठी सगळ्यांचे आभार मानले आहेत.
प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, आणि जयंत गायधनी सचिव नववर्ष स्वागत यात्रा समिती, तर्फे पत्र काढून ही माहिती दिली आहे.
– स्वागत समितीचे आवाहन
नाशिक शहराच्या प्रत्येक चौकात आणि मंदिरात गुढी उभारून हिंदू नव वर्षाचे स्वागत करावे असे आवाहन नववर्ष स्वागत समितीने केले आहे.
New Year Welcome Committee announces new dates for events
महत्त्वाच्या बातम्या
- रशियाकडून भारताला सवलतीत कच्चे तेलाचा पुरवठा ; १५ कोटी बॅरल देण्याची दर्शवली तयारी
- Thackeray – Pawar : महाविकास आघाडीच्या भिंतीला सकाळी “भेगा”; दुपारी “लांबी भरणी”; सायंकाळी “रंगसफेदी”!!
- The Kashmir Files : प्रत्यक्ष भेटीत पवारांनी दिले आशीर्वाद…, पण नंतर!!; विवेक अग्निहोत्रीने केले “एक्सपोज”
- केवायसी अपडेटच्या बहाण्याने पावणेनऊ लाखांची फसवणुक