• Download App
    संजय राऊतांच्या डिक्शनरीतून नवे शब्द बाहेर; "गुळगुळीत", "बुळगुळीत", "बुळचट" आणि "हलकट"!! New words out of Sanjay Raut's dictionary

    संजय राऊतांच्या डिक्शनरीतून नवे शब्द बाहेर; “गुळगुळीत”, “बुळगुळीत”, “बुळचट” आणि “हलकट”!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि मावळते खासदार संजय राऊत किरीट सोमय्या यांना दररोज आपल्या डिक्शनरीतले वेगवेगळे वाग्बाण सोडत ठोकत असतात. संजय राऊतांच्या डिक्शनरीतून आत्तापर्यंत किरीट सोमय्या यांच्यासाठी “चुत्या”, “येडझवा” हे शब्द सुटले आहेत. मात्र आज संजय राऊत त्यांच्या डिक्शनरीतून आणखी काही वेगळे शब्द बाहेर आले आहेत, ते म्हणजे “गुळगुळीत”, “बुळबुळीत” खुळचट आणि “हलकट”…!! अर्थात हे शब्द राऊतांनी राज्यातल्या गृह मंत्रालयाला आणि भाजपला उद्देशून वापरले आहेत.New words out of Sanjay Raut’s dictionary

    सिल्वर ओकवर दगडफेक आणि चप्पल फेक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पोलिस यंत्रणेचं अपयश असल्याचे म्हटल्यानंतर, आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.

    गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारणाचे परिणाम आपल्याला भोगावे लागल्याचे सांगत संजय राऊत यांनी राज्य सरकारवरच टीका केली आहे.


    Sanjay Raut – Pawar : शिवसैनिकांच्या जंगी स्वागतानंतर संजय राऊत म्हणाले, मी पवारांचा माणूस!!


    शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सदावर्ते यांनी याआधीही अनेकदा शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक विधाने केली आहेत, त्यामुळे याआधी त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, या प्रश्नावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा सरकारच्या संयमाचा कडेलोट आहे. इतका संयम आणि सहिष्णूता बरी नाही, हे आम्ही वारंवार सरकारला सांगत आहोत. कायद्याने अनेकदा कठोर व्हायला हवे. इतके गुळगुळीत, बुळबुळीत आणि बुळचट सत्ताकारण चालत नाही, त्याचेच परिणाम आज आपण भोगत आहोत, अशा शब्दात संजय राऊत यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

    सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा

    गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचा पाठिंबा आहे. त्यांना शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप राऊत यांनी भाजपवर केला आहे.

    उदयनराजेंवर निशाणा

    ज्याप्रकारे भाजपचे नेते या हल्ल्याचे समर्थन करत आहेत, हा त्यांचा हलकटपणा आहे. ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केले तेच आता भाजपमध्ये जाऊन पवारांच्या विरोधात बोलत आहेत, असं म्हणत त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

    New words out of Sanjay Raut’s dictionary

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!