विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात नवे निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार लग्न समारंभ, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना पन्नास जणांनाच उपस्थित राहता येणार आहे.New restrictions imposed in the state, wedding ceremonies, cultural, political events only 50 people are allowed to attend
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गुरुवारी राज्यात साडे पाच हजाराच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्याही साडे चारशेच्या पुढे गेली आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून 30 डिसेंबरला रात्री उशिरा नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
राज्य सरकारनं जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागू असणार आहेत. राज्यातील कोरोनाचा वाढता फैलाव पाहता राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संध्याकाळी दिले होते.
ख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निबंर्धांबाबत अंतिम निर्णय घेतील, असं सांगतानाच हे निर्बंध आज-उद्या लागू होतील, असंही ते म्हणाले होते. त्यानुसार गुरुवारी रात्री उशिरा राज्य सरकारकडून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी दिली जाईल.
अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू असेल. त्याचबरोबर स्थानिक परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा असणार आहे. तसेच यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.
New restrictions imposed in the state, wedding ceremonies, cultural, political events only 50 people are allowed to attend
- तलाकशुदा महिलांशी पंतप्रधानांनी साधला संवाद, स्वावलंबी होण्याचा दिला मंत्र
- मनी मॅटर्स : लवकर निवृत्त होणे म्हणणे फार सोपो, पण नोकरी सोडताना हा विचार कराच
- लाईफ स्किल्स : जीवनात यश मिळवायचे असेल तर आधी नेमके काय करायचे हे ठरवा
- भारतात ऑनलाईन गेमिंगमध्ये अफाट वाढ, गेमिंग ॲप कंपन्यांनी कमावले ३७७० कोटी रुपये