प्रतिनिधी
पुणे : न्यायनीती धुरंदर, कार्यतत्पर व लोकाभिमुख राजा म्हणून संभाजीराजे यांची ओळख आहे. दीडशे पेक्षा जास्त लढाया लढून त्यांनी सगळ्या लढाया जिंकल्या. महाराष्ट्राला समृद्ध आणि कार्यक्षम ठेवायचा असेल तर भविष्यात छत्रपती संभाजी महाराजां सारख्या राज्यकर्त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. संभाजी राजांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे, हीच काळाची गरज आहे, असे मत अखिल भारतीय शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर यांनी व्यक्त केले. Maharashtra needs State Governor like Sambhaji maharaj Vikas Paslkar; coronation day ceremony
छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती व संभाजी ब्रिगेडच्या वतीने डेक्कन येथे राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. डेक्कन येथे पेढे वाटून छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दोन सोहळा अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.
भोर, वेल्हा, मुळशी छत्रपतींच्या मावळ्यांची सरदारांची आणि सहकार्याची भूमी आहे. त्यांचा वैचारिक वारसा जतन करण्यासाठी छत्रपतींच्या विचारांचा जागर झाला पाहिजे, असे चंद्रकांत मोकाटे यांनी व्यक्त केले.
संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, दत्ताभाऊ पासलकर , श्रीकांत बराटे , महादेव मातेरे, जितेंद्र साळुंखे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत धुमाळ यांनी केले तर आभार विराज तावरे यांनी व्यक्त केले.
needs State Governor like Sambhaji maharaj Vikas Paslkar; coronation day ceremony
महत्त्वाच्या बातम्या
- जयंत पाटलांपाठोपाठ एलन मस्क यांना बंगालच्या मदरसा शिक्षणमंत्र्यांचे गुंतवणुकीसाठी निमंत्रण!!
- UP Elections : हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनी विधानसभेचे तिकीट नाकारले, काँग्रेसने दिली होती ऑफर
- AIMIM candidate list : एमआयएम उमेदवारांची पहिली यादी जाहीर, ओवेसींनी यूपी निवडणुकीत उतरवले हे उमेदवार
- वर्ध्यातील आर्वी अवैध गर्भपात प्रकरणात डॉक्टर नीरज कदम यांना ठोकल्या बेड्या