सर्व्हिस रोडने भरधाव जाणाऱ्या कारला दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यातील लोणीकाळभोर जवळील कवडीपाट टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. Near lonikalbhor toll plaza two car accident,two people dead and three persons injured
विशेष प्रतिनिधी
पुणे : सर्व्हिस रोडने भरधाव जाणाऱ्या कारला दुसऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना पुण्यातील लोणीकाळभोर जवळील कवडीपाट टोलनाक्यावर गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रिनीक प्रभाकर होले असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मृत दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. अपघातातील तीन गंभीर जखमींचीही नावे समजू शकले नाही.
पुणे सोलापूर मार्गावरील सर्हीस रोडवरुन हायवेवर अचानक आलेल्या एका कारला दुसऱ्या कारने जोरात धडक दिल्याने हा भिषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दोन्हीही कारचा या चक्काचूर झाला आहे.. अपघाताची माहिती समजताच हडपसर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण आणि जीवरक्षक डॉ. बच्चू सिंग टाक यांनी जखमीला दवाखान्यात नेण्यासाठी मदत केली.
Near lonikalbhor toll plaza two car accident, two people dead and three persons injured
महत्त्वाच्या बातम्या
- तुळजापूर देवस्थानच्या दागिने व नाण्यांच्या गैरवापराबाबत कारवाई करण्याचे सीआयडीचे महाराष्ट्र सरकारला पत्र
- BJP – NCP Alliance : जखमा उरातल्या; मीठ राष्ट्रवादीचे; चोळतायत अशिष शेलार!!
- बिल्डरला मारहाण प्रकरणी चौघांना अटक
- २०१७ मध्येच भाजप-राष्ट्रवादीत युतीची झाली होती चर्चा; आशिष शेलारांचा “गौप्यस्फोट”!!
- बर्ड फ्लू बाधित पहिला मानवी रुग्ण चीनमध्ये चार वर्षांच्या मुलाला लागण