वृत्तसंस्था
पुणे : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री साडेनऊ वाजता आनेवाडी टोलनाक्या जवळ एसटी बस जळून भस्मसात झाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.Near Anewadi toll plaza in Satara ST bus burnt down, passengers safe
उडतारे गावच्या हद्दीत चालत्या एसटीने पेट घेतल्याने खळबळ उडाली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
साताऱ्याहून पुणेकडे ही बस धावत होती. अचानक धूर आल्याने चालकाने एसटी बाजूला घेतली. त्यानंतर फक्त काही मिनिटांत संपूर्ण एसटीला आग लागली. बसने पेट घेतला. या भीषण आगीत एसटी जळून भस्मसात झाली. मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. एसटीमधील प्रवासी सुखरूप आहेत.भुईंज पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
Near Anewadi toll plaza in Satara ST bus burnt down, passengers safe
महत्त्वाच्या बातम्या
- IND vs PAK: महान सामन्यात हे पाच मोठे विक्रम होऊ शकतात, कोहली, रोहित आणि बुमराहलाही इतिहास रचण्याची संधी
- गोपीचंद पडळकर यांचं मोठं विधान ; म्हणाले – भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल
- १००% लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावाने लढविली आयडियेची कल्पना!!
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका