प्रतिनिधी
पुणे : रानवेडा निसर्गकवी हरपला, ना. धों. महानोर गेले. प्रसिद्ध निसर्गकवी प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर यांचे निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्या किडनी विकारावर उपचार सुरु होते. सकाळी 8.39 वाजता त्यांचे निधन झाले. उद्या पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते. nd mahanore passes away
– रानवेडा निसर्गकवी
ना. धों. महानोर यांचा परिचय१६ सप्टेंबर १९४२ ला जन्मलेल्या ना. धों. महानोर गेली ६० हून जास्त वर्षे कवितेची साधना करीत होते. मराठी काव्यविश्वात रानवेडा निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते. महानोरांचा जन्म पळसखेडच्या शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडील दुसऱ्याच्या शेतात राबत असत. महानोरांना चार भाऊ आणि तीन बहिणी. ते सगळ्यांत थोरले. प्राथमिक शिक्षण पळसखेडला झाल्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी ते पुढील शिक्षणासाठी ८-१० किलोमीटर अंतरावर असलेल्या शेंदुर्णीच्या शाळेत दाखल झाले. शेंदुर्णीच्या शाळेतच कवितेशी त्यांची ओळख झाली, कवितेची गोडी लागली. शाळेत असताना शाळेच्या नाटकांमधून त्यांनी कामंही केली.
– रानात राहणारा निसर्गकवी
मॅट्रिक झाल्यानंतर ते जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेत दाखल झाले. या महाविद्यालयात म. ना. अदवंत, राजा महाजन अशा साहित्यिक प्राध्यापकांनी महानोरांना भरपूर प्रोत्साहन दिले, परंतु घरातल्या अडचणींमुळे वर्ष पूर्ण होण्याच्या आतच शिक्षण सोडून त्यांना गावी जाणे भाग पडले. त्यांच्या वडिलांनी स्वत:ची पाच एकर कोरडवाहू जमीन विकत घेतली होती आणि शेतीच्या कामांसाठी वडिलांना त्यांची गरज होती. महानोरांचं शिक्षण थांबलं आणि ते शेतीत रमले.
ना. धों. महानोर या रानकवीने मराठी साहित्यावर अमीट नाममुद्रा उमटवली आहे. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधांनी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावलं आहे. रानात राहणारा हा कवी निसर्गाची भाषा बोलतो, निसर्गाशी संवाद करतो, रसिकाचं बोट धरून त्याला निसर्गात घेऊन जातो. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. या कवितेत निसर्गाचे विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाने फुललेला रोमांचित करणारा शृंगार आहे.
nd mahanore passes away
महत्वाच्या बातम्या
- पॉक्सो प्रकरणात बृजभूषण यांना दिलासा; अल्पवयीन कुस्तीपटूला दिल्ली पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टवर हरकत नाही
- देशातील 4001 आमदारांकडे 54,545 कोटी रुपयांची संपत्ती, ईशान्येतील 3 राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त
- हरियाणा हिंसाचाराची धग राजस्थानपर्यंत पोहोचली; उत्तर प्रदेशातही अलर्ट जारी, 5 ठार
- विरोधकांच्या’I.N.D.I.A’ची आज पहिली अग्निपरीक्षा; दिल्ली सेवा विधेयकावर लोकसभेत चर्चा होणार