• Download App
    राष्ट्रवादीचे विदर्भातील दुकान बंद होणार, सुपडासाफ करून टाकण्याचे नाना पटोले यांचे आवाहन|NCP's shop in Vidarbha to be closed, Nana Patole's appeal to clean up

    राष्ट्रवादीचे विदर्भातील दुकान बंद होणार, सुपडासाफ करून टाकण्याचे नाना पटोले यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : राज्यात आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्ते असले तरी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी मनाने एकत्र नाहीत हे पुन्हा उघड झाले आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विदर्भातून राष्ट्रवादीचे दुकान करून टाकण्याचे आव्हान दिले आहे. ऐवढेच नव्हे तर पंढरपूरमधील राष्ट्रवादीच्या पराभवावरून चांगलेच हिणविलेही आहे.NCP’s shop in Vidarbha to be closed, Nana Patole’s appeal to clean up

    बुलढाणा येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना पटोले म्हणाले, पंढरपूरची जागा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिंकता आली नाही. तिथे सगळे महान नेते बसले होते. राष्ट्रवादीचं तिकीट देऊनही पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं दुकान बंद होते.



    विदर्भात म्हणजेच बुलडाण्यात तर यांचं एकच दुकान आहे. विदभार्तील हे दुकान बंद व्हायल किती वेळ लागतो. राष्ट्रवादीचं दुकान विदर्भात नाही, हे इथल्या जनतेने अनेकवेळा सांगितलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे इथे दुकान आहे, हे म्हणणे चुकीचे आहे.

    राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने आपली सर्व शक्ती पणाला लावली होती.

    राष्ट्रवादीचे बडे नेते, मंत्री यांनी येथे बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विजय झाला होता. या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.

    NCP’s shop in Vidarbha to be closed, Nana Patole’s appeal to clean up

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    “पवार संस्कारित” काढताहेत एकमेकांचे जुने हिशेब; मधल्या मध्ये खराब होतीय फडणवीस सरकारची इमेज!!

    High Court : २००६ मुंबई लोकल बॉम्बस्फोट खटल्यात उच्च न्यायालयाचा धक्कादायक निकाल, ११ आरोपी निर्दोष मुक्त

    Sunil Tatkare : सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत प्रचंड गोंधळ; पत्ते उधळले, छावा संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी