MPSC Exams : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील फुरसुंगी येथे एका तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु मुलाखतीच झाल्या नाहीत, नोकरी नाही, त्यात आर्थिक अडचणी यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे आता राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी एमपीएसपी परीक्षा त्वरित घेऊन प्रलंबित नियुक्त्याही त्वरित देण्याची विनंती सरकारला केली आहे. NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील फुरसुंगी येथे एका तरुणाने आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला परंतु मुलाखतीच झाल्या नाहीत, नोकरी नाही, त्यात आर्थिक अडचणी यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. यामुळे आता राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी एमपीएसपी परीक्षा त्वरित घेऊन प्रलंबित नियुक्त्याही त्वरित देण्याची विनंती सरकारला केली आहे.
रोहित पवार यांनी ट्वीट केले की, कोरोनामुळं स्थगित केलेली #MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात.
स्वप्निल लोणकर हा सिव्हिल इंजिनिअर होता. नैराश्यातून त्याने केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेला खून असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
NCP MLA Rohit Pawar Demands Govt To Start MPSC Exams And Give pending Joining Orders
महत्त्वाच्या बातम्या
- सीएम केजरीवाल यांची पंतप्रधान मोदींना मागणी, या वर्षी डॉक्टरांना देण्यात यावा भारतरत्न
- भाजप नेत्यांशी भेटीवर संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण भारत-पाकिस्तानसारखे नाही
- फिलिपाइन्समध्ये मोठी विमान दुर्घटना, ९२ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे विमान कोसळले, १७ जण ठार
- सेना-भाजप एकत्र येणार का?, संजय राऊत – आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीवर सुधीर मुनगंटीवारांचे सूचक भाष्य
- Mithali Raj Record : मिताली बनली महिला क्रिकेटची तेंडुलकर, वन डे सामन्यांत सर्वाधिक धावा, कर्णधार म्हणूनही नंबर 1