• Download App
    संजय राऊत - इम्तियाज जलील आमने - सामने!!; एकमेकांवर डागल्या तोफा!! NCP - MIM Alliance sanjay raut imtiyaz jalil

    NCP – MIM Alliance : संजय राऊत – इम्तियाज जलील आमने – सामने!!; एकमेकांवर डागल्या तोफा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष यांच्यातील आघाडीची महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी अशा आघाडीची शक्यता फेटाळून लावली आहे. या मुद्द्यावर आता एमआयएमचे खासदार इमतियाज जलील आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. NCP – MIM Alliance sanjay raut imtiyaz jalil

    – औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे पक्ष

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील घटक पक्ष छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शांवर चालणारे आहेत. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे पक्ष महाराष्ट्राचा आदर्श होऊ शकत नाहीत, अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी एमआयएम पक्षाशी आघाडी करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

    – एमआयएमची राष्ट्रवादीला ऑफर

    एमआयएम पक्षाने आघाडी करण्याची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसला दिली आहे. राष्ट्रवादीचे मंत्री अंकुश टोपे यांच्याशी झालेल्या चर्चेत इमतियाज जलील यांनी आघाडीची इच्छा बोलून दाखवत शरद पवारांना निरोप पोहोचवा, अशी विनंती केली आहे.

    – संजय राऊतांवर पलटवार

    संजय राऊत यांनी एमआयएम पक्षाशी आघाडीची शक्यता फेटाळल्यानंतर इम्तियाज जलील यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रातल्या सगळ्यांचे आदर्श आहेत. या महापुरुषांच्या वारसा ही शिवसेनेची मक्तेदारी नाही. महाराष्ट्रातले मुसलमान दोन्ही छत्रपतींना आदर्श मानतात. औरंगजेबाचा काळ जुना होऊन गेला, अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी संजय राऊत यांना यांच्यावर पलटवार केला आहे. एक प्रकारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता एमआयएम पक्षाशी आघाडी करण्याच्या मुद्यावर एकमेकांच्या आमने-सामने आल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.

    – शिवसेनेला काटशह

    मराठवाड्यात शिवसेनेची राजकीय बांधणी आणि सामाजिक रचना वेगळी आहे. एमआयएम पक्षाशी युती करणे शिवसेनेला राजकीय दृष्ट्या परवडणारे नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम यांची युती झाली तर शिवसेनेला धक्का बसतो. या राजकीय गणितातून हे दोन पक्ष एकत्र येऊ नयेत, अशीच भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे.

    – राजेश टोपे यांची सावध भूमिका

    राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र या मुद्द्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राजेश टोपे यांची सावध भूमिका इम्तियाज जलील यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडी करण्याची ऑफर दिली असली तरी याबाबत राजेश टोपे यांनी सावध भूमिका मांडली आहे. अल्पसंख्यांकांचे कल्याण या मुद्द्यावर आमची चर्चा झाली. मात्र, आघाडीबाबतचा अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

    NCP – MIM Alliance sanjay raut imtiyaz jalil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ