प्रतिनिधी
मुंबई : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये सुप्रिया सुळे यांची भर पडली आहे. जयंत पाटील, अजितदादा पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांची पोस्टर्स भावी मुख्यमंत्री म्हणून लागली आहेत. NCP leaders always dreamt of further prime ministership – future chief ministership, quipped devendra Fadanavis
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टोला हाणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या नेत्यांना भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री असे म्हणायची पद्धतच आहे. पण मी अनुभवातून शिकलो आहे, की कधीही काहीही होऊ शकते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असे कोणाला वाटले होते का?, पण ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ज्यांना ज्यांना आपण भावी वाटतो आहोत, त्यांना माझ्या शुभेच्छा!!, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतील मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धकांना टोला हाणला आहे.
शरद पवार 1991 पासून पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांना कायम भावी पंतप्रधान असेच संबोधत आले आहेत. मराठी माध्यमे देखील पवारांच्या पंतप्रधान पदाच्या बातम्या उताविळीने देत असतात.
या पार्श्वभूमीवर जेव्हा जयंत पाटील, अजितदादा पवार यांच्या भावी मुख्यमंत्री पदाची पोस्टर्स राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या मुख्यालयासमोर झळकली, त्यानंतर आज सुप्रिया सुळे यांचे पोस्टर देखील महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असे झळकले. त्यावर सुप्रिया सुळे यांनी संतापही व्यक्त केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्या नेत्यांना भावी पंतप्रधान – भावी मुख्यमंत्री असे म्हणण्याची पद्धतच आहे, असे सांगून टोला हाणला आहे.
NCP leaders always dreamt of further prime ministership – future chief ministership, quipped devendra Fadanavis
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीत मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र; जयंत पाटील, अजितदादांनंतर सुप्रिया सुळे यांचेही भावी मुख्यमंत्र्याचे पोस्टर्स; पण सुप्रियाताई संतप्त!!
- CRPFच्या 4 सेक्टर्सच्या प्रमुखपदी पहिल्या महिला अधिकारी : चारू सिन्हा यांची दक्षिणेत महानिरीक्षक म्हणून नियुक्ती
- मोदींच्या वडिलांबद्दल अभद्र टिप्पणी करणाऱ्या काँग्रेस प्रवक्ते पवन खेडांना दिल्लीत विमानातून उतरविले; मोदींची कबर खोदण्याचा काँग्रेस नेत्यांच्या
- शिंदे-फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय : गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त100 रुपयांत आनंदाचा शिधा