• Download App
    नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले - फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं! । NCP Leader Nawab Malik Criticizes NCB Sameer Wankhede Ask About Fletcher Patel

    नवाब मलिक यांचा पुन्हा एनसीबीवर वार, एकापाठोपाठ ट्विट करत समीर वानखेडेंना घेरले, म्हणाले – फ्लेचर पटेल कोण हे NCBने सांगावं!

    NCP Leader Nawab Malik : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कार्यशैलीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट करून म्हटले की, यावेळी मी एनसीबीचे आणखी चुकीचे काम उघड करीन. मात्र, यावेळी ते पत्रकार परिषदेद्वारे नव्हे तर आपल्या ट्विटर हँडलवर खुलासा करणार आहे. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ ट्वीट करत एनसीबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. NCP Leader Nawab Malik Criticizes NCB Sameer Wankhede Ask About Fletcher Patel


    प्रतिनिधी

    मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कार्यशैलीवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. शनिवारी त्यांनी ट्विट करून म्हटले की, यावेळी मी एनसीबीचे आणखी चुकीचे काम उघड करीन. मात्र, यावेळी ते पत्रकार परिषदेद्वारे नव्हे तर आपल्या ट्विटर हँडलवर खुलासा करणार आहे. यानंतर त्यांनी एकापाठोपाठ ट्वीट करत एनसीबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

    एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर बेतलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी विचारले आहे की, फ्लेचर पटेल कोण आहेत? तो NCB आणि त्याच्या एका अधिकाऱ्याशी कसा संबंधित आहे? या फोटोत फ्लेचर पटेल कोणासोबत दिसत आहे, ज्यांना तो ‘माय लेडी डॉन’ म्हणतो. कोण आहे ही ‘लेडी डॉन’?

    तत्पूर्वी, बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात भाजप कार्यकर्ते मनीष भानुशाली आणि केपी गोस्वामी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी क्रूझवर पडलेल्या छाप्याला बनावटही म्हटले होते.

    नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, एनसीबीने त्यांच्या जावयाला गोवले आहे. त्याचप्रमाणे, आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आले आहे. गेल्या वर्षी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या ड्रग्ज चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांनाही NCB ने अटक केली होती. समीर खान यांना काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला. परंतु आता एनसीबीने त्यांच्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    NCP Leader Nawab Malik Criticizes NCB Sameer Wankhede Ask About Fletcher Patel

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!