• Download App
    औरंगजेबापाठोपाठ त्याच्या महालाचाही राष्ट्रवादी काँग्रेसला पुळका, महालाच्या संवर्धनाची मागणी, महाराष्ट्रात संताप ncp leader demads renovation of aurangjeb mahal in aurangabad

    औरंगजेबापाठोपाठ त्याच्या महालाचाही राष्ट्रवादी काँग्रेसला पुळका, महालाच्या संवर्धनाची मागणी, महाराष्ट्रात संताप

    प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : भारतात एकीकडे केंद्र आणि राज्य सरकारे गुलामीची चिन्हे निग्रहाने पुसून टाकत असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला याच गुलामीच्या चिन्हांचा पुळका आलेला दिसत आहे. ncp leader demads renovation of aurangjeb mahal in aurangabad

    राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना नुकताच औरंगजेबाचा पुळका आलाच होता, आता त्याच पक्षाच्या दुसऱ्या एका नेत्याला औरंगाबादेतील औरंगजेबाच्या महालाचा पुळका आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमाणीने औरंगाबादमधील औरंगजेबाच्या महालाच्या संवर्धनाची मागणी केली आहे. औरंगाबाद शहरामध्ये औरंगजेबाचा जुना महाल आहे, त्याचे संवर्धन करावे, अशी मागणी इलियास किरमाणी यांनी केली आहे. शहरामध्ये G20 अंतर्गत अनेक डागडुजीची कामे सुरू आहेत, त्यातच औरंगजेबाच्या महालाची दुरूस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

    औरंगजेबाच्या महाल मोठा आणि सुंदर आहे. ऑक्सफर्ड आणि पेनसेलव्हेनिया युनिव्हर्सिटीमध्ये या महालाची नोंद आहे, त्यामुळे या महालाचे सुशोभीकरण करण्यात यावे. कलेक्टर आणि कमिशनर जिकडे राहत आहेत ती जागाही मुघल शासकाच्या जमान्यातली आहे. हा महाल अधिकाऱ्याला द्या किंवा सरकारी कार्यालय बनवा. औरंगजेब हा मुसलमान शासक होता म्हणून त्याचा महाल तोडायचा का? हीच आपली मानसिकता आहे का? हेरिटेज म्हणून याचा वापर करा, अशी आमची मागणी आहे,  असे एलियास किरमाणी यांनी पत्रात म्हटले आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसने कडून केलेल्या या मागणीवर शिंदे गटाने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पापी औरंगजेबाची कबर खोदणारा हा महाराष्ट्र आहे. औरंगजेबाचा महाल सजविण्याची मागणी करणाऱ्यांना  महाराष्ट्राची जनता जशास तसे उत्तर देईल. या मागणीची मलाही चीड आली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा औरंगजेबाने हाल करून मारले. मात्र अशा निर्घृण माणसाच्या कबरीचे आणि महालाचे सुशोभीकरण करणे योग्य नाही. मी एक मंत्री असल्यामुळे जास्त बोलू शकत नाही,  अशा शब्दांत शंभुराज देसाई यांनी संताप व्यक्त केला.

    राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, त्यांनी केलेल्या मागणीचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे.

    जितेंद्र आव्हाड वादात

    राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काहीच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. मुघलांचा इतिहास पुस्तकातून काढणार असे विनोद तावडेंनी विधानसभेत जाहीर केले होते. पण समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत. त्याच्यातून ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना,  असे आव्हाड म्हणाले होते.

    आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने औरंगजेबाच्या महालाच्या संवर्धनाची मागणी केल्याने महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

    ncp leader demads renovation of aurangjeb mahal in aurangabad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस