प्रतिनिधी
औरंगाबाद : एकीकडे आम्ही भाजपला छुपी मदत करतोय असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही स्वतःहून महाविकास आघाडीपुढे मैत्रीचा प्रस्ताव ठेवतोय तर आम्हाला दूर लोटायचं ही भूमिका दुटप्पी आहे. भाजपला हलविण्याचे आमचे मिशन आम्ही सुरु ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रिया एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इमतियाज जलील यांनी व्यक्त केली आहे.NCP – AIMIM Alliance: MIM is coming to the forefront for BJP’s defeat, why is it going away ??; Imtiaz Jalil to meet Uddhav Thackeray
एमआयएमचा डाव : उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी शिवसेनेच्या सर्व खासदारांची संवाद साधताना एमआयएम या पक्षाने महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव देणे हा भाजपचा डाव असल्याची टीका केली होती. हा डाव तुम्ही उधळून लावा जनतेपर्यंत हिंदूत्व पोहोचवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. सत्ता मिळत असली तरी एमआयएम या सारख्या पक्षांशी शिवसेना कधीही आघाडी करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणार : जलील
या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना इम्तियाज जलील म्हणाले, की एकीकडे आम्हाला भाजपशी छुपी युती करतो असे हिणवायचे आणि दुसरीकडे आम्ही स्वतःहून महाविकास आघाडीत येण्यासाठी इच्छुक असताना आम्हाला दूर लोटायचे हा दुटप्पी प्रकार आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत आहेत. पण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर सत्तेत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना आपण हिंदुत्ववाद्यांबरोबर सत्यता व तसे वाटते आहे का??, असा रोकडा सवाल इम्तियाज जलील यांनी केला आहे.
भाजपला हरविण्याचे मिशन
एमआयएम या पक्षाला भाजपला निश्चित ठरवायचे आहे यासाठीच आमचे मिशन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांना आम्ही आमची भूमिका पटवून देण्यासाठी लवकरच भेटणार आहोत, असेही इमतियाज जलील यांनी स्पष्ट केले आहे.
NCP – AIMIM Alliance: MIM is coming to the forefront for BJP’s defeat, why is it going away ??; Imtiaz Jalil to meet Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- Salasar Balaji Mandir : योगी आदित्यनाथांचा बुलडोझर गुंड माफियांवर; अशोक गेहलोतांचा बुलडोझर सालासर बालाजी मंदिराच्या गेटवर!!
- NCP – AIMIM Alliance : एमआयएमची आघाडी राष्ट्रवादीशी; बदनामी शिवसेनेची; कट कोणाचा??… निशाणा कोणावर??
- World Sparrow Day : या चिमण्यांनो परत फिरा रे…आज जागतिक चिमणी दिवस -चला सारे मिळून हाक देऊ लाडक्या ‘चिऊ’ ला…
- Uddhav Thackeray Shivsena MPs : शिवसेनेला धोका राष्ट्रवादी – एमआयएम आघाडीचा; उद्धव ठाकरेंचा निशाणा भाजपवर!!