नाशिक : हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी करण्याची ऑफर दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कालची खळबळ निर्माण झाली आहे वादळात रूपांतर झाले आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा शिवसेनेची बदनामी करण्याचा कट असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. NCP – AIMIM Alliance leads with NCP
मात्र प्रत्यक्षात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आघाडी करण्याची ऑफर दिली आहे. मग यात शिवसेनेची बदनामी येते कुठून…?? शिवसेनेला एमआयएम पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करत असेल तर धोका का वाटतो…?? ते भाजप वर त्यासाठी निशाणा का साधतात…??, हे कळीचे प्रश्न आहेत.
– मराठवाडा, मुंबईत धोका
वास्तविक इमतियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर देताना शिवसेनेच्या नेत्यांवर टीका टीकास्त्र सोडले आहे. त्यामुळे शिवसेनेशी आघाडी करण्याची त्यांची इच्छा नाही हेच स्पष्ट होते. अशा स्थितीत राष्ट्रवादी आणि एमआयएम यांचा खरा राजकीय धोका मराठवाड्यासारख्या प्रदेशात आणि मुंबई परिसरातील काही मतदारसंघांमध्ये शिवसेनेला संघटनात्मक पातळीवर उद्भवतो. निवडणुकीत त्याचा फटका शिवसेनेलाच बसतो. हे लक्षात घेऊन शिवसेना नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पण ही आक्रमक भूमिका थेट राष्ट्रवादी विरुद्ध न घेता त्यांना भाजप विरुद्ध आणि एमआयएम विरुद्ध घ्यावी लागली आहे. नेमकी हीच शिवसेनेची “राजकीय कोंडी” आहे.
मराठा – मुस्लिम कॉम्बिनेशनला तोड काढता येईना
प्रत्यक्षात शिवसेनेने विरोध केला तरी राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएम पक्ष अशी उघड किंवा छुपी आखाडी करणार हे निश्चित आहे. यातून त्यांना मराठा – मुस्लिम कॉम्बिनेशन चालायचे आहे. आणि असे मराठा – मुस्लिम कॉम्बिनेशन काही टक्केवारीने जरी साधले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संख्येत शिवसेनेला मागे टाकू शकते. त्यामुळे शिवसेनेची “राजकीय बार्गेनिंग पॉवर” अर्थातच घटते. हा खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धोका वाटत आहे आणि म्हणून भाजप वर शरसंधान साधत भाजपनेच एम आय एम ला फूस लावल्याचा आरोप उद्धव ठाकरे करताना दिसत आहेत.
– शिवसेनेची बदनामी पवारांनाही हवी
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची ठळकपणे कोंडी दिसून येत आहे. किंबहुना अशी कोंडी व्हावी फक्त भाजपचीच इच्छा असल्याचे मानणे हे राजकीय भोळेपणाचे लक्षण ठरेल. अशी इच्छा खरे म्हणजे शरद पवार यांचे असू शकते किंबहूना आहेच. कारण शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जेवढी बदनामी तेवढा शिवसेनेच्या हिंदू व्होट बँकेला मोठा धक्का आणि तो भाजपच्या पथ्यावर पडणारा. असे असले तरी त्यातल्या काही घटक निश्चित राष्ट्रवादीच्या पदरात पडणार. त्यामुळे शिवसेनेची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली बदनामी देखील भाजप इतकीच शरद पवार यांना देखील हवी आहे, हे उघड राजकीय गुपित आहे…!!
NCP – AIMIM Alliance leads with NCP
महत्त्वाच्या बातम्या
- बीटकाॅईन गुन्हयातील सायबर तज्ञ आराेपींवरील एमपीआयडी कलम रद्द
- Pakistan Military Coup : पाकिस्तानात कोणत्याही क्षणी इम्रान खानचा तख्तापलट!!; लष्कर प्रमुख बाजवा ऍक्टिव्हेट!!
- डॉ.बलजीत कौर यांना ‘आप’ चा नियम नाही?
- Kirit Somaiya – Yashwant Jadhav : यशवंत जाधवांचा 1000 कोटींचा घोटाळा, 36 इमारतींची खरेदी, पण कोणत्या?; किरीट सोमय्यांच्या आरोपातून खुलासा!!