Cruise Drugs Case : एनसीबीने अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बोलावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज आणि रेव्ह पार्टी प्रकरणात चौकशीसाठी ड्रायव्हरला बोलावण्यात आले आहे. सध्या शाहरुख खानचा ड्रायव्हर एनसीबी कार्यालयात असल्याची बातमी विविध माध्यमांनी दिली आहे. अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू आहे. NCB summoned shahrukh khan driver for enquiry on aryan khan cruise drugs case
प्रतिनिधी
मुंबई : एनसीबीने अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला बोलावले आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज आणि रेव्ह पार्टी प्रकरणात चौकशीसाठी ड्रायव्हरला बोलावण्यात आले आहे. सध्या शाहरुख खानचा ड्रायव्हर एनसीबी कार्यालयात असल्याची बातमी विविध माध्यमांनी दिली आहे. अभिनेता शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी सुरू आहे. शाहरुख खानचा चालक आर्यन खानला क्रूझ पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी सोडण्यासाठी गेला होता.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या ताब्यात आहे. त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. जामीन मंजूर न झाल्याने शुक्रवारी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर त्याची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली. त्याला आर्थर रोड कारागृहात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यापूर्वी आर्यन खानची कोरोना चाचणी करण्यात आली होती. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आर्यन खानला इतर कैद्यांसोबत ठेवले जाईल. त्याचा सहआरोपी अरबाज मर्चंटलाही आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आले आहे. सहआरोपी मुनमुन धामेचाला भायखळा कारागृहात नेण्यात आले आहे.
ड्रायव्हरची चौकशी सुरू
एनसीबीचे अधिकारी शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी करत आहेत. आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये सोडल्यामुळे ड्रायव्हरला ड्रग्ज पार्टीबद्दल काही महत्त्वाची माहिती असू शकते. ही माहिती या प्रकरणाबाबत महत्त्वाची ठरू शकते. असे म्हटले जातेय की, आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट पार्टीमध्ये जमले होते. अरबाजकडून 6 ग्रॅम औषधे जप्त करण्यात आली आहेत.
या सर्व घडामोडी पाहता एनसीबी प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. आर्यन खानकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाही, परंतु अरबाजकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी ड्रायव्हर एनसीबीला मदत करू शकतो. याच कारणामुळे शाहरुखच्या ड्रायव्हरला बोलावून घेण्यात आले आहे.
NCB summoned shahrukh khan driver for enquiry on aryan khan cruise drugs case
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्राच्या नव्या गाइडलाइन्स : कंटेनमेंट झोनमध्ये सभेस परवानगी नाही, साप्ताहिक आकडेवारीवरून सूट किंवा निर्बंध ठरवणार
- लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा दसऱ्याला जाळणार पीएम मोदी-अमित शहांचा पुतळा, 18 ऑक्टोबरला देशभरात रेल्वे रोको
- कॉंग्रेसची 16 ऑक्टोबरला CWCची बैठक, संघटनात्मक निवडणुका आणि पक्षाच्या गळतीवर होणार मंथन, पक्षाध्यक्ष निवडीचा मुहूर्त लागणार?
- Cruise Drugs Case : राष्ट्रवादीच्या आरोपांवर NCBची पत्रकार परिषद, नियमानुसार आमची कारवाई, तपासानंतरच आरोपींना अटक!
- चिपी विमानतळाच्या उद्घाटनात “विकासाचे अलायन्स” म्हणत ठाकरे – राणे यांचे एकमेकांना टक्के – टोणपे