अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. आर्यन खान प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या आरोपाला दुजोरा देत त्यांनी एक ऑडिओ क्लिपही दिली आहे. NCB officials put pressure on umpires, start paper-changing business, alleged audio clip released by Nawab Malik
वृत्तसंस्था
मुंबई : अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. आर्यन खान प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. आपल्या आरोपाला दुजोरा देत त्यांनी एक ऑडिओ क्लिपही दिली आहे.
या क्लिपनुसार, एनसीबी अधिकारी मॅड नावाच्या एका पंचाला पंचनाम्यात बदल करून घेण्यासाठी सही करण्यास सांगत असल्याचा दावा मलिकांनी केला आहे. जुन्या पंचनाम्यात बदल करण्यासाठी एनसीबी अधिकारी पंचाला फोनवर ऑफिसच्या बाहेर भेटण्यास सांगत आहेत. वाब मलिक म्हणाले की, ”मागच्या काळात बनवलेल्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी एनसीबीकडून पंचावर दबाव टाकला जातोय. एक मॅडी नावाचा पंच आहे. एनसीबीचा किरण बाबू नावाचा अधिकारी मॅडी नावाच्या पंचाला ऑफिसमध्ये न बोलावता ऑफिसबाहेर बोलावून पंचनामा बदलण्याचं बोलत आहे. तसेच अधिकारी पंचाला जुन्या पंचनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत आहेत.” मलिकांनी दावा केलाय की, समीर वानखेडेही त्यांना सही करण्यास सांगत आहेत. आम्ही त्यांना एक्स्पोझ करण्याच्या भीतीने एनसीबी अधिकारी पंचनामे बदलण्याचा फर्जीवाडा करत आहेत. हा सगळ्यात मोठा फर्जीवाडा आहे, असेही ते म्हणाले.
एक व्हिडीओ क्लिपही मलिकांनी व्हायरल केली असून ऑडीओत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि पंच मॅडी यांच्यातील संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला आहे.