• Download App
    नक्षलवाद्यांचेही ऑनलाईन शिक्षण, लॅपटॉपवर दिले जात आहे छुप्या युध्दाचे प्रशिक्षण|Naxals are also being given online education, covert warfare training on laptops

    नक्षलवाद्यांचेही ऑनलाईन शिक्षण, लॅपटॉपवर दिले जात आहे छुप्या युध्दाचे प्रशिक्षण

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : घनदाट जंगलात राहणाऱ्या नक्षलवाद्यांनीही आता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यांनीही ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. मात्र, हे पारंपरिक शिक्षण नाही तर छुप्या युध्दाचे प्रशिक्षण आहे. लॅपटॉपवर हे शिक्षण दिले असून त्यासाठी पेनड्राईव्हचा वापर केला जातो.Naxals are also being given online education, covert warfare training on laptops

    पोलीसांनी नक्षलवाद्यांकडून ४२ पेन ड्राईव्ह जप्त केले आहेत. माओवाद्यांच्याही आता डिजिटल शाळा भरू लागल्या आहेत. आता त्यांना लॅपटॉपवर छुप्या युद्धासाठी लागणारे ट्रेनिंग, व्हिडिओमार्फत देण्यात येत आहे. रोज जंगलात त्यांचे ट्रेनिंग होते. छुप्या युद्धात कसा पोलिसांवर विजय मिळवला जाऊ शकतो ह्याचे विशेष व्हिडियो त्यांना दाखवल्या जातात. सोबतच पोलिसांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा देखील वापर करू लागले आहे.



    तसेच नक्षलवादी सामाजिक फ्रंटवर पण काम करत असल्याचे पुढे आले आहे. ठिकठिकाणी शहरी नक्षलवाद किंवा दर्शनी संघटनांच्या माध्यमातून गावातल्या लोकांना सामील करून जे कार्यक्रम घेतले जातात त्याचे व्हिडिओ फिल्ड नक्षलवाद्यांना दाखवले जातात. ज्यामुळे चळवळीतील सर्वच घडामोडींबाबत जंगलातील नक्षलवादीही सजग असतात.

    चेतना नाट्य मंचाचे नाच-गाणी, क्रांतिकारी विचारांची नाट्येही या पेन ड्राईव्ह मिळली आहेत. या माध्यमातून वेगवेगळे मुद्दे घेऊन स्थानिकांना शासनाच्या विरोधात चीड निर्माण करायचा प्रयत्न असतो. त्यासाठी ते आता तंत्रज्ञानाचा वापरात वाढवत असल्याचे पुढे आले आहे.

    Naxals are also being given online education, covert warfare training on laptops

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- जग भारतीय अध्यात्माला महत्त्व देते, अर्थव्यवस्थेला नाही; म्हणूनच आपण विश्वगुरू

    Prakash Ambedkar श्रीमंत मराठ्यांच्या मागे ओबीसींची फरफट; पवारांच्या मंडल यात्रेची प्रकाश आंबेडकरांकडून पोलखोल!!

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची घोषणा- लाडक्या बहिणींच्या मानधनात वाढ करणार, योजना 5 वर्षे सुरूच राहणार, बहिणींनी सावत्र भावांचे मनसुबे उधळले