वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा कोणत्याही परिस्थितीत घ्यायचा नाही यावर ठाम असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला कोर्टात पुन्हा एकदा धक्का बसला आहे.Nawab Malik’s ED remanded till March 7
नवाब मलिक यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची कोठडी 7 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे. पीएमएलए कोर्टाने आज हा निर्णय दिला. नवाब मलिक यांची कोठडी आज संपली होती. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केले होते. नवाब मलिक हे चौकशी आणि तपासाला सहकार्य करत नाहीत. उलट ते ईडीच्या अधिकाऱ्यांनाच धमक्या देत आहेत, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. याबाबत ईडीने काही कागदपत्रे कोर्टाला सादर केली आणि नवाब मलिक यांच्या कोठडीची मुदत वाढ मागितली. कोर्टाने नवाब मलिक यांची कोठडी 7 मार्च पर्यंत वाढवली आहे.
– बीकेसीत आढळला 200 कोटींचा भूखंड
नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. नवाब मलिक यांच्या नावावर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसी मध्ये तब्बल 200 कोटींचा भूखंड असल्याचे आढळून आले आहे. त्याच वेळी काल उच्च न्यायालयाने देखील नवाब मलिक यांना दणका दिला होता. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेले आरोप फेटाळण्याचा अर्ज नवाब मलिक यांनी केला होता. त्या अर्जावर आज सुनावणी घेऊन ते आरोप न्यायालयाने फेटाळले नाहीतच, उलट सुनावणी पुढच्या सोमवार पर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना न्यायालयाकडून दिलासा मिळण्याऐवजी दणकाच मिळाला आहे.
– ईडी कोठडीची मुदत वाढणार?
नवाब मलिक यांची ईडी कोठडीची मुदत आज 3 मार्च रोजी संपली. त्यांना पीएएमएल कोर्टात हजर करून ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कोठडीची मुदत आणखी वाढवून मागितरी. नवाब मलिक हे चौकशी आणि तपासात सहकार्य करत नाहीतच उलट अधिकाऱ्यांना धमकावत असल्याच्या तक्रारी देखील अधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
नवाब मलिक पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. हा गुन्हा रद्द करण्यासाठी व विशेष पीएमएलए न्यायालयाने सुनावलेली ईडी कोठडी रद्द करण्यासाठी नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर २ मार्च रोजी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने ईडीला उत्तर दाखल करण्यासाठी ७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे.
– हायकोर्टात सोमवारी सुनावणी
नवाब मलिक यांना आता 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी बेकायदेशीर असल्याचा दावा करत, मलिक यांनी आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. मात्र मलिकांची तातडीने सुटका होणार नाही. नवाब मलिकांना ईडीच्या कारवाईतून कोणताही तातडीचा दिलासा मिळाला नाही. नवाब मलिक यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयाकडे वेळ मागितला होता. आता नवाब मलिकांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.
Nawab Malik’s ED remanded till March 7
महत्त्वाच्या बातम्या
- OBC reservation supreme court : ओबीसी आरक्षणावरून ठाकरे – पवार सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका; मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल नाकारला!!
- राष्ट्रवादी – शिवसेनेचे आणखी मंत्री ईडीच्या रडारवर; तर राज्यपाल महाविकास आघाडीच्या टार्गेटवर!!
- पिंजऱ्यात बंदिस्त मोर वनविभागाकडे सुपूर्द ; वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीची कामगिरी