अमेय खोपकर यांनी म्हटले की , नवाब मलिक यांच्याकडून जास्मिन वानखेडे यांच्यावर केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही.Nawab Malik’s allegations against Jasmine Wankhede, MNS became aggressive
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी आरोप केले होते. दरम्यान मनसेने यासंदर्भात पत्रकार परिषद घेत जास्मिन यांची पाठराखण केली आहे.
यावेळी मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले की , नवाब मलिक यांच्याकडून जास्मिन वानखेडे यांच्यावर केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नाही .मनसे चित्रपट सेनेच्या जास्मिन वानखेडे या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी बहीण यास्मिन यांचा फ्लेचर पटेल यांच्यासोबतचा एक फोटो ट्विट केला होता. आणि त्या फोटोच्या खाली ‘ माय सिस्टर , लेडी डॉन ‘ असे लिहिले होते. त्यावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली होती.
याच पार्श्भूमीवर पुढे खोपकर म्हणाले की, नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. एखाद्या महिलेला त्यांनी लेडी डॉन बोलणे चुकीचे आहे. मलिकांनी जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत.
महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालते, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो, त्यांना अटक करून दाखवा, असे आव्हान खोपकर यांनी नवाब मलिक यांना केले.
Nawab Malik’s allegations against Jasmine Wankhede, MNS became aggressive
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेशातील हिंदूंवरचे हल्ले “छोट्या घटना”; इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या महासंचालकांचे वादग्रस्त वक्तव्य
- NCB Raid : अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीचा छापा, आर्यन खान प्रकरणाशी काही संबंध आहे का? जाणून घ्या सविस्तर
- Farmers Protest: गाझीपूर बॉर्डर राष्ट्रीय महामार्ग आंदोलकांनी केला खुला, राकेश टिकैत म्हणाले – आम्ही बंदच कधी केला होता!
- बड्या,बड्या बाता ; ‘धोरण’ खातंय लाथा वडेट्टीवारांची गत : आमदार गोपीचंद पडळकर