• Download App
    शेवटपर्यंत मंत्रिमंडळातून न काढलेल्या नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून मात्र डच्चू!! Nawab Malik, who was not removed from the cabinet till the end, was removed from the national executive of the NCP

    शेवटपर्यंत मंत्रिमंडळातून न काढलेल्या नवाब मलिकांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून मात्र डच्चू!!

    • जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदी बढती

    प्रतिनिधी

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणात गजाआड असलेल्या नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने हळूच मुख्य प्रवक्ते पदावरून दूर केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नुकतीच आपली राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून, त्यातून नवाब मलिक यांना डच्चू दिला आहे. पण त्याच वेळी जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून बढतीही दिली आहे. Nawab Malik, who was not removed from the cabinet till the end, was removed from the national executive of the NCP

    नवाब मलिक यांना दाऊदच्या बहिणीशी आर्थिक गैरव्यवहारात संबंध एवढे गंभीर आरोप असूनही आणि त्यांना अटक केल्यानंतरही राष्ट्रवादीने त्यांचे मंत्रिपद कायम ठेवले होते. त्यावरून चौफेर टीका झाल्यानंतरही अध्यक्ष शरद पवार आपल्या निर्णयावर कायम होते. मात्र, सत्ताबदल होताच त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेल्या नवाब मलिकांना त्यांनी आता चार हात लांब ठेवले असून, राष्ट्रीय कार्यकारणीतून त्यांना वगळले आहे. याआधी मलिक हे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते होते. नव्या कार्यकारणीत त्यांना स्थान दिलेले नाही. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती दिली आहे.


    Nawab Malik : “बिनखात्याचे मंत्री” जेलमध्ये, शासन निर्णय मात्र “अल्पसंख्यांक मंत्री” म्हणून जाहीर!!


    १० आणि ११ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना कार्यसमिती सदस्य, स्थायी निमंत्रित, प्रदेशाध्यक्ष, आघाडीच्या संघटना, विभाग इत्यादींसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले.

    यानुसार पवार यांनी कार्यकारिणीची यादी जारी केली आहे. त्यानुसार शरद पवार : राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल्ल पटेल – राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस, योगानंद शास्त्री – राष्ट्रीय सरचिटणीस, के के शर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस, पीपी मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस, नरेंद्र वर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस, जितेंद्र आव्हाड – राष्ट्रीय सरचिटणीस, वाय पी त्रिवेदी – राष्ट्रीय कोषाध्यक्ष, एस आर कोहली – स्थायी सचिव राजीव, तर हेमंत टकले, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन यांची नियुक्ती राष्ट्रीय सचिव पदावर करण्यात आली आहे.

    नवे प्रवक्ते कोण?

    नरेंद्र वर्मा यांची राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय ब्रिजमोहन श्रीवास्तव, धीरज शर्मा, सोनिया दोहान, सीमा मलिक प्रवक्ते, क्लाईड क्रास्टो यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

    Nawab Malik, who was not removed from the cabinet till the end, was removed from the national executive of the NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ