वृत्तसंस्था
मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या ज्या पुणे वक्फ बोर्डाची जमिन मी लाटली असे म्हणतात त्या जमीन घोटाळ्याप्रकरणी पुढच्या आठवड्यात भाजपच्याच एका नेत्याविरुद्ध एफआयआर दाखल होणार आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी ईडीचे प्रवक्ते म्हणून मला धमकावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला वाचवण्याचा प्रयत्न करावा,Nawab malik targets kirit somya and ed officers
असा प्रतिटोला महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लगावला आहे.ईडीने मला समन्स पाठवावे. मी चौकशी आणि तपासाला हजर होईन, असेही त्यांनी सांगितले. पण ईडीचे अधिकारी महाराष्ट्राची बदनामी करत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
त्यापूर्वी, नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्यात, तेच “सरकारी पाहुणे” बनणार!!; अशा शब्दात किरीट सोमय्यांचा यांनी हल्लाबोल केला होता.
नवाब मलिक यांनी आपल्या घरी “सरकारी पाहुणे” येणार असल्याचे ट्विट केले होते.या मुद्द्यावरून किरीट सोमय्या यांनी त्यांचा समाचार घेतला असून नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडपल्या आहेत. त्यांना केंद्रीय तपास संस्था आपल्या घरी येण्याची खात्री आहे, म्हणूनच ते हात-पाय मारत आहेत
. पण असे हात-पाय मारून चौकशी आणि तपास थांबणार नाही, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पुण्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनींच्या घोटाळ्यासंदर्भात माहिती दिली आहे.
किरीट सोमय्या यांचे हे ट्विट असे :
नवाब मलिक सध्या बोलत आहेत की, “माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत” माझे नवाब मलिकांना एक सांगणे आहे, ” जर आपण घोटाळा केला असेल, पुणे वक्फ बोर्डाचा घोटाळा .. जमिन गोंधळात आपले नाव असेल…” “तर आपल्या घरी सरकारी पाहुणे नाही येणार… आपल्यालाच सरकारचे पाहुणे बनावे लागणार.
Nawab malik targets kirit somya and ed officers
महत्त्वाच्या बातम्या
- वासीम रिझवीं पाठोपाठ मल्याळी दिग्दर्शक अली अकबरही इस्लाम सोडणार; हिंदू धर्म स्वीकारणार!!
- CDS Bipin Death : सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीच्या अस्थींचे आज गंगेत विसर्जन, मुली घेऊन जाणार
- आपला तिरंगा नेहमीच उंच राहील, सीडीएस बिपिन रावत यांनी येथूनच घेतले प्रशिक्षण – राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे उत्तराखंडमध्ये संबोधन
- नवाब मलिकांचा म्हणाले, “आज-उद्या घरी सरकारी पाहुणे येणार! गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू”
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई