राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटले की, मित्रांनो, आज किंवा उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, घाबरायचे नाही, लढायचे आहे, गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू.” त्यांच्या या ट्वीटवर आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे. Nawab Malik said, Government guests will come to our house today Or tomorrow, Gandhi fought against White, we will fight against thieves
वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ट्विट करून म्हटले की, मित्रांनो, आज किंवा उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, घाबरायचे नाही, लढायचे आहे, गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू.” त्यांच्या या ट्वीटवर आता विविध प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे.
उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर, महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टिप्पणीबद्दल बिनशर्त माफी मागितली आहे. नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनीही मुंबई उच्च न्यायालयासमोर यापुढे समीर वानखेडेविरोधात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वक्तव्य करणार नसल्याचे मान्य केले.
नवाब मलिक यांनी जाणूनबुजून विरोधात जाऊन एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टिप्पणी केली, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या मानहानीच्या खटल्यात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी समीरच्या कुटुंबाविरुद्ध वक्तव्ये करणार नाही, असे न्यायालयाला पटवून दिले होते. यानंतरही त्यांनी वक्तव्य केले. यासाठी त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात माफी मागितली आहे.
Nawab Malik said, Government guests will come to our house today Or tomorrow, Gandhi fought against White, we will fight against thieves
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे जिल्ह्यात १७ लाख रुपयांचा गुटखा पकडला ; यवत येथे पोलिसांची कारवाई
- इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी
- आक्रमकांचा तमोमय इतिहास पुसून पुन्हा सोन्याने झळाळली बाबा विश्वनाथ यांची काशीनगरी!!
- 13 डिसेंबर 2021 : काशी विश्वनाथ कॉरिडाॅर उद्घाटन; राष्ट्रविकासाचे संपूर्ण महिनाभर महामंथन!!
- एस एस राजामौली यांच्या RRR सिनेमाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
- पुणे – मुंबईत दिवसभरात ओमायक्रॉनचे ७ नवे रुग्ण; मुंबईत ३, पिंपरी-चिंचवडमध्ये ४ रुग्ण