प्रतिनिधी
मुंबई : दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याकडचे अल्पसंख्यांक मंत्रालय काढून घेऊन ते जितेंद्र आव्हाड यांना सोपवले आहे. पण याची भनक महाराष्ट्र शासनाला नाही. महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या निर्णयांची जी यादी ट्विट केली आहे, त्यामध्ये नवाब मलिक हे अजूनही “अल्पसंख्यांक मंत्री” आहेत आणि त्यांच्याच नावाने एक शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. Nawab Malik: “Minister without Account” in jail, but the ruling was announced as “Minority Minister” !!
येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता, असा शासन निर्णय नवाब मलिक यांच्या नावाने जाहीर करून ते “अल्पसंख्यांक मंत्री” असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सीएमओ ट्विटर हँडल वरून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नवाब मलिक आता बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होऊनही त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. ते सध्या तुरुंगात आहेत. याचा सीएमओ ट्विटर हँडल चालवणार्याला पत्ताच नाही. बाकीच्या मंत्रालयाशी संबंधित निर्णय विविध मंत्र्यांच्या नावानिशी आणि पदानिशी जाहीर करण्यात आले आहेत. तसेच नवाब मलिक हे अजूनही अल्पसंख्यांक मंत्री आहेत असेच गृहीत धरून सीएमो ट्विटर हँडलवरून शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तुरुंगात असलेल्या बिन खात्याच्या मंत्र्याच्या नावाने शासन निर्णय जाहीर करण्याचा हा आगळा वेगळा “विक्रम” आहे…!!
Nawab Malik : “Minister without Account” in jail, but the ruling was announced as “Minority Minister” !!
महत्त्वाच्या बातम्या
- कोकण चित्रपट महोत्सव – २०२२ रूपरेषा व पुरस्कार जाहीर
- Raj Thackeray : सभेपेक्षा जास्त चर्चा अटीशर्तींची; 15000 च्या गर्दीची…!!; पण यातले रहस्य काय…??
- हिंदीविरुध्द वादात आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची उडी, बॉलीवुडवर साधला निशाणा
- समाज ठरवेल तोपर्यंतच सरकार राहू शकते, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
- मुंबई पोलीसांनी आपल्या नावावर बनावट एफआयआर केला दाखल, उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा
- शेतकरी मेळाव्यांमध्ये अल्ला हू अकबरच्या घोषणा देणारे राकेश टिकैत यांचा भोंगे हटविण्याच्या मागणीला पाठिंबा