• Download App
    पोटदुखी थांबल्यावर नवाब मलिक पुन्हा ईडी कोठडीत; मालिकांच्या मुलाला ईडीचे समन्स; "मुहूर्तावर" संजय राऊतांचे PMO ला पत्र!!|Nawab Malik again in ED cell after stomach ache stopped; Ed's summons to the owner's son; Sanjay Raut's letter to PMO "on the spot"

    पोटदुखी थांबल्यावर नवाब मलिक पुन्हा ईडी कोठडीत; मालिकांच्या मुलाला ईडीचे समन्स; “मुहूर्तावर” संजय राऊतांचे PMO ला पत्र!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हसीना पारकर तिच्याबरोबर जमीन गैरव्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक गेले आहेत. आज त्यांचा मुलगा फराज मलिक यालाही ईडीचे समन्स आले आहे. हा “मुहूर्त” साधत शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला ईडीचे अधिकारी खंडणी गोळा करत असल्याचे पुरावे सादर करणारे पत्र लिहिले आहे.Nawab Malik again in ED cell after stomach ache stopped; Ed’s summons to the owner’s son; Sanjay Raut’s letter to PMO “on the spot”

    संजय राऊत यांनी या पत्रामध्ये नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांची नावे लिहिली आहेत? कोणता गौप्यस्फोट केला आहे?, याविषयी उत्सुकता असल्याचे रिपोर्टिंग मराठी माध्यमांनी केले आहे. पण नवाब मलिक यांची पोटदुखी बरी झाल्यानंतर ते जे. जे. हॉस्पिटलमधून पुन्हा ईडी कोठडीत गेले आणि त्यांचा मुलगा फराज मलिक याला समन्स आले, हा “मुहूर्त” संजय राऊत यांनी “साधून” पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहिले, या “मुहूर्ताचे इंगित” मात्र मराठी माध्यमांना सांगता आले नाही…!!



    शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपांनंतर आता त्यांनी पुढचे पाऊल उचलत केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असल्याची तक्रार संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे. काही अधिकारी खंडणी प्रकरणात गुंतले असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.

    “आता खेळ सुरू झाला आहे,” असे ट्विट करत आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिक माहिती देऊ, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

    आता खेळ सुरू झाला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कशा पद्धतीने आपल्या अधिकार क्षेत्राचा गैरवापर करत आहेत याबाबतची माहिती पुराव्यांसकट पंतप्रधान कार्यालयाला दिली आहे. काही अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत वसुली एजंटच्या माध्यमातून खंडणी मागत असून काही जणांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    लवकरच पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिक माहिती आणि पुरावे आपण देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा संजय राऊत यांच्या आगामी हाय व्होल्टेज पत्रकार परिषदेची चर्चा रंगली आहे.

    राऊतांची पत्रकार परिषद

    शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा तसेच भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. आपण लवकरच याबाबतची तक्रार करणार असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे आता पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या माहितीत नेमक्या कोणत्या अधिका-यांची नावे आहेत हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

    Nawab Malik again in ED cell after stomach ache stopped; Ed’s summons to the owner’s son; Sanjay Raut’s letter to PMO “on the spot”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस