प्रतिनिधी
मुंबई : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून 2023 या वर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांनी आज दिले.Navy Day 2023 dedicated to Chhatrapati Shivaji Maharaj
आतापर्यंत नौसेना दिवस नवी दिल्ली आणि मुंबई येथे साजरा होत असे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस आणि त्यानिमित्ताने आयोजित करण्यात येणारे मुख्य कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार भारतीय नौदल या कार्यक्रमांचे नियोजन करणार आहे.
सिंधुदुर्ग या वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्याचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व खूप मोठे आहे. त्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे एक संधी आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील रस्ते चांगले करा. जेट्टीसह विविध सुविधा वेळेत उभारण्यात याव्यात. पर्यावरण विभागाशी निगडित परवानग्या तसेच आवश्यक गोष्टींसाठी विभागांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.
Navy Day 2023 dedicated to Chhatrapati Shivaji Maharaj
महत्वाच्या बातम्या
- पवारांना महाराष्ट्रात बहुमताने सत्ता मिळवता आली नाही; वळसे पाटलांच्या वक्तव्याला अजितनिष्ठ राष्ट्रवादीचा पाठिंबा
- गिरणी कामगारांसाठी 5000 घरांची लॉटरी; कार्यवाहीला मुख्यमंत्र्यांची गती!!
- भारताचा तिरंगा आणि मराठीचा झेंडा; फडणवीसांनी शेअर केला जपान दौऱ्याच्या पहिल्या दिवसाचा अनुभव
- आधीच्या चोऱ्या लपविण्यासाठीच पवार गट सत्तेच्या वळचणीला; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल