• Download App
    तुळजाभवानी देवीचे शारदीय नवरात्र साधेपणाने; यंदा कोरोनाच्या संकटामुळे मंदिर समितीचा निर्णय|Navratra of Goddess Tulja Bhavani simply; This year the decision of the temple committee due to the corona crisis

    तुळजाभवानी देवीचे शारदीय नवरात्र साधेपणाने; यंदा कोरोनाच्या संकटामुळे मंदिर समितीचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : यावर्षीही तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे साधेपणाने धार्मिक विधी करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.Navratra of Goddess Tulja Bhavani simply; This year the decision of the temple committee due to the corona crisis

    महाराष्ट्राची कुलस्वामिनी व साडेतीन शक्तीपीठपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव २९ सप्टेंबरपासून मंचकी निद्रेने सुरू होणार आहे. या वर्षीही मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे भक्ताविना हा सण साजरा करण्यात येणार आहे.



    मंचकी निद्रेनंतर ७ ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीची मुर्ती सिंहासनावर प्रतिष्ठपित केली जाईल. नंतर घटस्थापना करण्यात येणार आहे, हा उत्सव २१ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. मंदिरात प्रवेश मिळणार नसल्याने भविक तसेच व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

     

    शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त कार्यक्रम

    • देवीच्या मंचकी निद्रा २९ सप्टेंबर रोजी सुरुवात
    • मुर्तीची ७ ऑक्टोंबरला सिंहासनावर प्रतिष्ठापना
    •  घटस्थापना करून नवरात्र उत्सवाला सुरुवात
    • देवीची ८ ऑक्टोंबल नित्‍योपचार पूजा व छबीना
    • रथ अलंकार महापूजा ९ ऑक्टोंबर रोजी
    • मुरली अलंकार महापूजा १० ऑक्टोंबर रोजी
    • शेषशाही अलंकार महापूजा ११ ऑक्टोंबर रोजी
    • भवानी तलवार अलंकार महापूजा ११ ऑक्टोबरला
    • महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा १३ ऑक्टोबरला
    • घटोत्थापन १४ ऑक्टोंबर रोजी
    • विजयादशमी दसरा :१५ रोजी पहाटे सिमोल्लंघन
    • कोजागीरी पोर्णिमानंतर १९ ऑक्टोबरला अन्नदान

    Navratra of Goddess Tulja Bhavani simply; This year the decision of the temple committee due to the corona crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस