Navi mumbai airport naming : नवी मुंबई विमानतळाला नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे की दि. बा. पाटलांचे… हा राजकीय वाद रंगला असताना मनसेप्रमुख राज ठाकरे या वादात उतरले आहेत. विमानतळाला नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे द्या. त्यांच्या नावापेक्षा कोणाचे नाव मोठे असू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. Navi mumbai airport naming contraversy; raj thackeray opines it should named after chhatrapati shivaji maharaj
विशेष प्रतिनिधी
मुंबई : नवी मुंबई विमानतळाला नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे की दि. बा. पाटलांचे. हा राजकीय वाद रंगला असताना मनसेप्रमुख राज ठाकरे या वादात उतरले आहेत. विमानतळाला नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे द्या. त्यांच्या नावापेक्षा कोणाचे नाव मोठे असू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
राज्यातल्या ठाकरे – पवार सरकारने नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा निर्णय घेतला असताना स्थानिकांकडून दि. बा. पाटलांचे नाव देण्याची मागणी पुढे करण्यात आली. या वरून वाद सुरू झाला असून राज ठाकरे यांनी त्यावर भूमिका मांडली आहे. विमानतळ नामकरणाच्या वादात पाठिंबा मागण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आले होते, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
राज ठाकरे म्हणाले, की “विमानतळ हे काही सिडकोने मंजूर केलेले आणि राज्याने प्रस्तावित केलेले आहे असे नाही. हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्याच नावाने होईल. बाळासाहेब ठाकरे किंवा दि. बा. पाटील यांच्या मोठेपणाबद्दल दुमत नाही, अशी पुस्तीही राज ठाकरे यांनी जोडली. आता कोण रस्त्यावर उतरते ते बघू असे सांगत राज ठाकरेंनी प्रसंगी उद्धव ठाकरेंशी बोलेन. पण यामध्ये काही विषय दिसत नाही असे स्पष्ट केले.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी देखील दि. बा. पाटलांचे नाव देण्याची भूमिका मांडली होती. त्याबाबत विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले की, राजू पाटील माझ्या भेटीला आले होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली तेव्हा हा विषयच संपला असे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे अजून कोणाचे नाव येऊच शकत नाही. महाराज हे आपली ओळख आहेत. महाराजांच्या भूमीतले म्हणून आपल्या ओळखतात. त्यामुळे येथे जो कोणी येईल तो महाराजांच्या भूमीत येईल.
Navi mumbai airport naming contraversy; raj thackeray opines it should named after chhatrapati shivaji maharaj
महत्त्वाच्या बातम्या
- ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा
- उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यक्रमातील गर्दी, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांना अटक
- काँग्रेस – राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडायला फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलेलं – हसन मुश्रीफ
- पुण्यामध्ये आज कोविशिल्ड लस उपलब्ध; १५७ केंद्रांवर सुविधा ; १०० डोस वितरित
- नानांच्या “दोन दाढीवाल्यांचे शटर बंद करायचेय” टीकेला भातखळकरांचे “दाढीचे खुंट वाढवून फिरणारा पाहा”ने प्रत्युत्तर