• Download App
    नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद; मनसेच्या एकमेव आमदाराचीही राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका|navi mumbai airport name row; MNS MLA raju patil differs from raj thackeray`s point of view

    नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद; मनसेच्या एकमेव आमदाराचीही राज ठाकरेंच्या विरोधात भूमिका

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई  : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून पेटवलेल्या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उडी घेत विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली असताना मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात जाऊन भूमिका मांडली आहे.navi mumbai airport name row; MNS MLA raju patil differs from raj thackeray`s point of view

    विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबईतील मोर्चात सामील होऊन केली आहे.नवी मुंबईत दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या मोर्चात मनसे आमदार राजू पाटील सहभागी झाले. दि. बा. पाटलांच्या नावासाठी आज सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.



    राज ठाकरे यांनी परवाच पत्रकार परिषद घेऊन विमानतळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने व्हावे. त्यांच्या पेक्षा कोणाचेही नाव मोठे नाही. स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हीच भूमिका मांडली असती, असे म्हटले होते.

    प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी ही भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी आमदार राजू पाटील यांचीही याला सहमती असल्याचे सांगितले होते.पण आज राजू पाटील यांची भूमिका बदललेली दिसली. त्यांनी पुन्हा एकदा दि. बा. पाटलांच्या नावाचे समर्थन केलेले दिसले.

    बाळासाहेब ठाकरे किंवा दि. बा. पाटील यांच्या नावाचा संघर्ष आत्ता सुरु झाला आहे. दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केले ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे दि. बा. पाटलांचेच नाव विमानतळाला दिले अशी आमची देखील इच्छा आणि आग्रह आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने व्यक्त केली आहे.

    navi mumbai airport name row; MNS MLA raju patil differs from raj thackeray`s point of view

     

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना