• Download App
    लढा कोरोनाविरोधातील : एक देश एक धोरण राबवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारला आग्रह ; सर्व पक्षीय बैठकीची मागणी | The Focus India

    लढा कोरोनाविरोधातील : एक देश एक धोरण राबवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा केंद्र सरकारला आग्रह ; सर्व पक्षीय बैठकीची मागणी

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोना विरोधी लढाईसाठी केंद्र सरकारने ‘एक देश एक धोरण ‘ राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादीने सरकारवर टीका केली आहे. Nationalist Congress Party Urge’s Central Government to Implement “one nation, one policy” to fight the Coronavirus pandemic.

    महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष असून कोरोनाबाबत केंद्र सरकारने एक देश एक धोरण राबविले पाहिजे, अशी मागणी केली आहे.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणाबाबत चर्चा करण्यासाठी तातडीने सर्व पक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे.



    कोरोनाविरोधातील लढाई केवळ जाहिराबाजी करून जिंकता येणार नाही, अशी टीका करताना मलिक म्हणाले, त्यासाठी एक देश एक धोरण राबविणे काळाची गरज बनली आहे.
    उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंभीर परिस्थितीबद्दल ते म्हणाले, कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यावर तेथे अंत्यसंस्कार न करताच मृतदेह नदीत सोडले जात आहेत.

    Nationalist Congress Party Urge’s Central Government to Implement “one nation, one policy” to fight the Coronavirus pandemic.

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ