• Download App
    National Children's Award 2022 : जळगावच्या शिवांगी काळेला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार प्रदान|National Children's Award 2022: Prime Minister's Bal Shakti Award presented to Shivangi Kale of Jalgaon

    National Children’s Award 2022 : जळगावच्या शिवांगी काळेला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार प्रदान

    जळगावची लेक शिवंगीने बहादूर आणि कौतूकास्पद कार्य करून पुरस्कर मिळवत जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.National Children’s Award 2022: Prime Minister’s Bal Shakti Award presented to Shivangi Kale of Jalgaon


    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : बाल शक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये या वर्षी देशभरातील 29 मुलांची राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.हा पुरस्कार 6 श्रेणींमध्ये म्हणजेच नवकल्पना, क्रीडा, कला आणि संस्कृती, समाजसेवा, शालेय क्षेत्र आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो.

    दरम्यान आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देशातील बाल शौर्य विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.दरम्यान प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार जळगावची साडेसहा वर्षाची लेक शिवांगी काळे हिला प्रदान झाला आहे.जळगावची लेक शिवंगीने बहादूर आणि कौतूकास्पद कार्य करून पुरस्कर मिळवत जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.



    दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 18 वर्षांपेक्षा कमी असावे.तसेच प्रत्येक राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला एक लाख रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान २०२२ च्या चिल्ड्रन पुरस्कार विजेत्यांना ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल प्रमाणपत्रे देण्यात आली.

    जळगावची लेक शिवांगी काळे

    जळगाव येथील शिवांगी काळे या चिमुकलीने आपल्या आईला विजेचा धक्का लागला असतांना प्रसंगावधान राखून तिचे प्राण वाचविल्याने आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.५ जानेवारी २०२१ रोजी एक घटना घडली. शिवांगीची आई घरात बाथरूममध्ये असतांना त्यांना विजेच्या हिटरचा शॉक लागला.

    दरम्यान त्या मोठ्याने किंचाळल्या.यावेळी बाथरूमच्या बाहेर पाच वर्षाची शिवांगी ही दोन वर्षाच्या आपल्या बहिणीसह खेळत होती. शिवांगीची आई मोठ्याने किंचाळल्याने या दोन्ही बहिणी आईची अवस्था पाहून घाबरल्या. मात्र यावेळी शिवांगीने न घाबरता घटनेचे प्रसंगावधान राखून आईला स्पर्श न करता हिटरचे स्वीच बंद केले.

    त्यामुळे यातून तिने आईचे प्राण तर वाचवलेच. पण ती आणि तिच्या बहिणीलादेखील दुर्घटनेपासून वाचविले.यामुळे आज तिला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. दरम्यान आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह शिवांगी आणि तिच्या पालकांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. या कार्यक्रमात तिला गौरविण्यात आले.

    National Children’s Award 2022: Prime Minister’s Bal Shakti Award presented to Shivangi Kale of Jalgaon

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!