वृत्तसंस्था
पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पीएमपीने दैनिक पासचे दर घटविले आहेत. यामुळे प्रवाशांना पूर्वीपेक्षा स्वस्तात प्रवास करण्याची संधी मिळाली आहे.
Good News for Punekar, PMP’s gift to those traveling by PMPML, murlidhar mohol
पुणे आणि पिंपरी- चिंचवडमध्ये पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. पूर्वी एक दिवस प्रवास करण्यासाठी ७० रुपयांचा पास काढावा लागत असे. त्यात आता कपात करून तो ४० रुपये एवढा करण्यात आला आहे.
पुणे शहरात दिवसभर फिरायचे असल्यास दैनिक पास ४० रुपयांना मिळणार असून त्याच, धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये फिरण्यासाठीही अवघ्या ४० रुपयांत दैनिक पास मिळणार आहे. परंतु, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही शहरांत दिवसभर फिरायचे असल्यास प्रवाशांना पाससाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.
‘प्रवाशांना दिलासा देण्यासाठी पीएमपीच्या दैनंदिन पासचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवासी संख्या वाढेल, असा अंदाज आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्या बस दाखल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळतील.’,
असे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पीएमपीच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने गुरुवारी फेटाळला. त्यामुळे, महागाईपासून दिलासा पुणेकरांना मिळाला आहे.
Good News for Punekar, PMP’s gift to those traveling by PMPML, murlidhar mohol
महत्त्वाच्या बातम्या