- बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना ही विशेष भेट दिली आहे. Nashik: Yeola Muktibhoomi; The status of ‘B’ class pilgrimage site received from the government
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली, ती येवला मुक्तीभूमी आहे.येवला शहर हे नाशिक-निफाड- औरंगाबाद रस्त्यावरील एक महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. या ठिकाणी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मातराची घोषणा केली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ‘येवला मुक्तीभूमी’ या ऐतिहासिक स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना ही विशेष भेट दिली आहे.ऐतिहासिक महत्व असलेल्या येवला मुक्तीभूमीला ‘ब; वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी भुजबळ हे पाठपुरावा करीत होते. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. या प्रस्तावास मंजुरी मिळून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
ही जागा मुक्तीभूमीकरीता आरक्षित आहे. या मुक्तीभूमीचा विकास सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्ती पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेकडून केली जाते.
Nashik : Yeola Muktibhoomi; The status of ‘B’ class pilgrimage site received from the government
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबात क़ॉंग्रेसचा वचपा काढण्यासाठी कॅप्टन अमरिंदर सिंग पुन्हा नव्या जोमाने रिंगणात
- वयाच्या सत्तरीतही गुडघ्याला बांधले बाशिंग, जाहिरातीनंतर इच्छुक वधुंच्या प्रस्तावाचा पाऊस
- रशिया व युक्रेनच्या फौजा आमनेसामने, युद्धाच्या भितीने समस्त युरोपला ग्रासले
- महाराष्ट्रातील सहकारी बॅँकेवर रिझर्व्ह बॅँकेची कारवाई, १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही