• Download App
    NASHIK : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव ; सापडले दोन रूग्ण |NASHIK: Corona's participation in All India Marathi Literary Conference; Two patients found

    NASHIK : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव ; सापडले दोन रूग्ण

    कोरोनाचे दोन रूग्ण आढळूनही लोक मास्क लावत नसल्याचं आणि गर्दी करत असल्याचं चित्र आहे.NASHIK: Corona’s participation in All India Marathi Literary Conference; Two patients found


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दोन रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर तीन रूग्ण संशयित आहेत. कोरोनाची दुसरी लाट हे साहित्य संमेलनातलं सर्वात मोठं विघ्न होतं. ती ओसरल्यानंतर साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरवण्याचं निश्चित कऱण्यात आलं. अशात आता याच साहित्य संमेलनात कोरोनाने शिरकाव केला आहे.



    दरम्यान कोरोनाचे दोन रूग्ण आढळूनही लोक मास्क लावत नसल्याचं आणि गर्दी करत असल्याचं चित्र आहे.

    इतकंच नाही तर कोव्हिड प्रतिबंधक व्यवहार म्हणजेच कोव्हिड प्रोटोकॉलही अनेक लोक पाळत नसल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे या ठिकाणी झालेल्या संमेलनामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार तर नाही ना अशी भीती आता नाशिककरांना आहे. कोरोनामुळे हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आलं होतं. या संमेलनाच्या सुरूवातीपासूनच वादांची मालिका आणि अडथळ्यांची मालिका सुरू झाली. कोरोनाची दुसरी लाट हा यामधला सर्वात मोठा अडथळा होता.

    संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच या साहित्य संमेलनावर वाद आणि अडथळ्यांचं सावट आहे हेच दिसून येतं आहे.

    मात्र संभाजी महाराजांवर लिहिण्यात आलेल्या पुस्तकानंतर वादात सापडलेल्या गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना साहित्य संमेलनात घडली आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या समारोपाला गालबोट लागलं आहे.

    NASHIK: Corona’s participation in All India Marathi Literary Conference; Two patients found

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!