बॉलीवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना देशात गृहयुद्धाची भीती वाटतेय. ते म्हणाले की, देशात सर्व काही मुस्लिमांना धमकवण्यासाठी केले जात आहे. चर्च-मशिदी पाडल्या जात आहेत, कल्पना करा मंदिर पाडले तर कसे वाटेल? मुस्लिमांच्या नरसंहाराची हाक देणारेच देशात गृहयुद्ध पुकारत आहेत, असे नसीरुद्दीन शाह यांचे मत आहे. सत्ताधारी पक्ष फुटीरतावादाला खतपाणी घालत असून औरंगजेबाची बदनामी केली जात असल्याचे ते म्हणाले, एवढेच नाही तर त्यांनी मुघलांना निर्वासितही म्हटले आहे. Naseeruddin Shah Said churches and mosques are being demolished, how would you feel if a temple is demolished
वृत्तसंस्था
मुंबई : बॉलीवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांना देशात गृहयुद्धाची भीती वाटतेय. ते म्हणाले की, देशात सर्व काही मुस्लिमांना धमकवण्यासाठी केले जात आहे. चर्च-मशिदी पाडल्या जात आहेत, कल्पना करा मंदिर पाडले तर कसे वाटेल? मुस्लिमांच्या नरसंहाराची हाक देणारेच देशात गृहयुद्ध पुकारत आहेत, असे नसीरुद्दीन शाह यांचे मत आहे. सत्ताधारी पक्ष फुटीरतावादाला खतपाणी घालत असून औरंगजेबाची बदनामी केली जात असल्याचे ते म्हणाले, एवढेच नाही तर त्यांनी मुघलांना निर्वासितही म्हटले आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत शाह यांनी हरिद्वार येथील धर्मसंसदेबाबत भाष्य केले. मुस्लिमांनी एकत्र येण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ही आम्हा 20 कोटी लोकांची मातृभूमी आहे. आम्ही इथले 20 कोटी लोक आहोत. मुस्लिमांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले जात आहे. आपल्या मुलांना वाचवायचे आहे. मी धर्माबद्दल बोलत नाही आणि कधी करणार ही नाही. आता देशात धर्म सहजपणे धोक्यात येतोय. अशी मोहीम सुरू झाल्यास तीव्र विरोध होईल आणि लोकांच्या रोषाचा उद्रेक होईल.
हिंदू खतरे में असे का बोलले जातेय?
नसीरुद्दीन म्हणाले, देशात हिंदूंची लोकसंख्या जास्त असताना हिंदूंना धोका असल्याचे कसे बोलले जात आहे. आम्हाला शांततेत जगू द्या. मला पाकिस्तानात जाण्यास सांगणाऱ्या व्यक्तींना मी म्हणेण की, तु्म्ही कैलासला का जात नाहीस. उर्दू ही पाकिस्तानी भाषा म्हणून ओळखली जाते. एवढ्या वर्षात राजकारण कधीच इतके खाली गेले नव्हते. आज भारतात जन्मलेल्यांचे भविष्य काय आहे हे माहीत नाही.
Naseeruddin Shah Said churches and mosques are being demolished, how would you feel if a temple is demolished
महत्त्वाच्या बातम्या
- फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार
- आयआयटीच्या पदवीधारकांनी आरामाऐवजी आव्हानांचा पर्याय निवडावा – मोदी यांचे आवाहन
- महाराष्ट्रात पुन्हा वाढू लागला कोरोनाचा संसर्ग, पुढील दोन-तीन आठवडे महत्त्वाचे
- खाद्यतेलाच्या प्रमुख ब्रॅँडनी किंमती दहा ते पंधरा टक्यांनी केल्या कमी
- झाशीच्या राणीचा गौरव, झाशी रेल्वे स्टेशनचे वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन नामकरण