विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन कृषि कायद्यांसंदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्वागत केले आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.Narendra Singh Tomar welcomes Sharad Pawar’s role in the need to amend the new Agriculture Act, not repeal it
तोमर म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. म्हणूनच सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तीन नवीन कृषी कायदे आणले आहेत. आता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी हे कायदे रद्द करू नये असे म्हटले आहे. कायद्यांमधील ज्या मुद्द्यांवर आक्षेप आहे त्यात सुधारणा करण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली आहे.
शरद पवार यांच्या भूमिकेशी केंद्र सरकार सहमत आणि त्यांच्या भूमिकेचे स्वागत आहे. सरकारने या दृष्टीने ११ वेळा शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा केली आहे. कृषी कायद्यांवरून शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये निर्माण झालेला जो तिढा तो लवकरात लवकर सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून विविध शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. यात पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी मोठ्या संख्येत सहभागी झाले आहेत. या नव्या कृषी कायद्यांना त्यांचा तीव्र विरोध आहे.
आता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनीही हे कृषी कायदे रद्द करण्याऐवजी विरोध असलेल्या मुद्द्यांवर सुधारणा करण्याची भूमिक घेतली आहे.केंद्र सरकारचे तीन नवी कृषी कायदे रद्द करण्याची गरज नाही. त्या मुद्द्यांवर आक्षेप आहे त्यावर चर्चा करून कायद्यांमध्ये अपेक्षित सुधारणा करण्यात यावी, असं शरद पवार म्हणाले होते.
Narendra Singh Tomar welcomes Sharad Pawar’s role in the need to amend the new Agriculture Act, not repeal it
महत्त्वाच्या बातम्या
- ED ने समन्स न पाठवताही त्यांच्यासमोर हजर राहायला निघालेल्या शरद पवारांची ED ने प्रत्यक्ष कारवाई केल्यावर प्रतिक्रियाही का नाही…??
- गुजरातमधल्या स्टर्लिंग घोटाळ्यात अहमद पटेलांचा जावई इरफान सिद्दीकी, अभिनेता संजय खान, दिनो मोरिया यांच्या मालमत्तांवर ED ची जप्तीची कारवाई
- महाविकास आघाडीवरचे टोकदार आरोप आणि संजय राऊतांभोवतीचा “प्रश्न पिंगा…!!”
- राष्ट्रवादीमागे ईडीची कटकट; शिवसेनेत संघटनात्मक खदखद…!!
- आरक्षणाबाबत प्रश्न विचारायचे असतील तर मला मुख्यमंत्री करा, संभाजीराजे छत्रपती यांचे बीडमध्ये वक्तव्य