• Download App
    तब्बल १ हजार १२७ किलो गांजा पकडल्यानंतर नांदेडमध्ये दोन ठिकाणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे छापे; आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता । Narcotics Control Bureau raids at two places in Nanded after seizing 1,127 kg of cannabis; Possibility of getting more threads

    तब्बल १ हजार १२७ किलो गांजा पकडल्यानंतर नांदेडमध्ये दोन ठिकाणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे छापे; आणखी धागेदोरे हाती येण्याची शक्यता

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातली आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई करत नांदेडमध्ये मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काल तब्बल 1 हजार 127 किलो गांजा पकडला. त्यानंतर आज नांदेडमध्ये दोन ठिकाणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी छापे घालत असून तेथे गांजा प्रकरणातली बरीच माहिती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातून मिळणाऱ्या धाग्यादोऱ्यावर आधारून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पुढची कारवाई करणार आहे. गेल्या दोन तासांपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी या छाप्यांमध्ये कार्यरत आहेत. काल 1127 किलो एवढा मोठ्या प्रमाणावर गांजा पडल्यानंतर दोघांना अटक केली आहे. त्यांना स्थानिक कोर्टात पेश करून पुढची कारवाई सुरु आहे. Narcotics Control Bureau raids at two places in Nanded after seizing 1,127 kg of cannabis; Possibility of getting more threads

    आंध्र प्रदेश – महाराष्ट्रच्या बॉर्डरवर काल ही कारवाई करण्यात आली. 1 हजार 127 किलो गांजा पकडण्यात यश आल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रसार माध्यमांना दिली होती. आत्तापर्यंत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करून 5000 किलो पेक्षा जास्त ड्रग्ज पकडण्यात आली आहेत. पण काल महाराष्ट्रात आज मोठी कारवाई झाली.



    या कारवाईदरम्यान, दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून एक अवजड वाहन आणि कारसुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचे वानखेडेंनी सांगितले. अजूनही यासंदर्भात कारवाई चालू असून, एवढ्या जास्त प्रमाणातील गांजा सप्लायर आणि कन्सुमर्सचा शोध घेण्यात येत आहे. 1 हजार 127 किलो गांजा पकडणे, ही मुंबई नार्कोटिक्स ब्यूरोची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

    लोखंडाची वाहतूक करत असलेल्या ट्रकमधून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा आणण्यात आला होता. आंध्र प्रदेशातून हा ट्रक महाराष्ट्राच्या दिशेने येत असताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा घालून गांजा पकडला. महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये हा गांजा पुरवला जाणार होता. ही कारवाई अजून चालू असून, या कारवाई संदर्भातील अधिक माहिती हाती आल्यावर अपडेट करू, असे समीर वानखेडेंनी स्पष्ट केले होते.

    Narcotics Control Bureau raids at two places in Nanded after seizing 1,127 kg of cannabis; Possibility of getting more threads

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस