विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली. नारायण राणे हे संगमेश्वरमध्ये गेस्ट हाऊसवर जेवत असताना भरल्या ताटावरून त्यांना उठवून त्यांना अटक केली.
नारायण राणे यांचे चिरंजीव माजी खासदार निलेश राणे हे पोलीसांवर प्रचंड संतापले. त्यांनी आधी ऑर्डर दाखवा. साहेब जेवत आहेत. हात नाही लावायचा, असे निलेश राणे पोलिसांवर ओऱडत असल्याचा विडिओ व्हायरल झाला आहे.
स्वतः निलेश राणे आणि त्यांच्या बरोबरच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या भोवती कडे केले असल्याचे तसेच नारायण राणे यांच्या हातात जेवणाचे ताट आहे, हे देखील या व्हिडिओत दिसत आहे.
- नारायण राणे यांना जेवताना उठवले
- जेवत असताना भरल्या ताटावरून उठवून अटक
- राणे यांचे चिरंजीव निलेश राणे प्रचंड संतापले
- अटकेची आधी ऑर्डर दाखवा : निलेश राणे
Narayan Rane Woke up while eating food