• Download App
    नारायण राणेंची पुन्हा टीका, म्हणाले- "घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही!" । Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena During Jan Ashirwad yatra Press in Ratnagiri

    नारायण राणेंची पुन्हा टीका, म्हणाले- “घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही!”

    Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री नारायण यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सिंधुदुर्गात या यात्रेचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी, राणे यांना झालेली अटक आणि सुटका यानंतरही शिवसेना विरुद्ध राणे हा वाद सुरू आहे. आज पुन्हा एकदा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले, घरात पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नव्हता, हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात. Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena During Jan Ashirwad yatra Press in Ratnagiri


    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सिंधुदुर्गात या यात्रेचा समारोप होणार आहे. तत्पूर्वी, राणे यांना झालेली अटक आणि सुटका यानंतरही शिवसेना विरुद्ध राणे हा वाद सुरू आहे. आज पुन्हा एकदा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले, घरात पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नव्हता, हे वर्षावर जाऊन गप्पा मारत बसतात.

    रत्नागिरीत पत्रकार परिषदेदरम्यान राणे म्हणाले की, केस केल्यानं राणे घाबरणार असं वाटलं असेल, पण मी घाबरणारा नाही, ते रक्तात नाही. सुशांतसिह राजपूतची हत्या आणि दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या झाली. त्याचे आरोपी मिळाले नाही. नारायण राणेच्या पाठीमागे लागू नका. नाहीतर मी आता थोडं बोलतोय. नाहीतर सगळं बोलावं लागेल ते परवडणारं नाही. मी कुठलाही गुन्हा केला नाही. आपण सत्तेत आहोत, ती सत्तेची मस्ती दाखवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. काही हरकत नाही. आम्ही काही कायम विरोधी पक्षात राहण्यासाठी आलो नाही. भविष्यात आम्हीही सत्तेत येऊ. त्यामुळे अधिकारी, पोलिसांनी कायद्यात राहून काम करावं. कायद्याच्या बाहेर जाऊन काम कराल तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा राणेंनी दिला आहे.

    राणे पुढे म्हणाले की, जर मी क्रिमिनल होतो तर मुख्यमंत्री कसं केलं? इतके दिवस मंत्री कसा राहिलो? आता मोदींच्या काळात केंद्रीय मंत्री झालो. पण पहिली पदं यांनीच दिली ना. तेव्हा नव्हतं का कुणी विरोध करायला? साहेबांना जेव्हा दहशतवाद्यांकडून धोका होता, तेव्हा त्यांना मातोश्री सोडायला सांगितलं तेव्हा साहेबांनी सुपुत्राला सोबत घेतलं नाही.

    नारायण राणे पुढे म्हणाले की, सभेची बंधनं फक्त नारायण राणेंनाच आहे का? आम्हाला मनाई का? कोरोनाची लाट होती तेव्हा कारवाई झाली नाही? आता संपल्यावर कारवाई होतेय. त्यांना विरोध करू दे, ही सत्तेची मस्ती आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दरोडे पडत आहेत. खून मारामारी विचारू नका. सुशांतची हत्या झाली. दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. आरोपी नाही मिळाले. अशी अनेक प्रकरणे आहेत. त्यांचे खरे आरोपी नाही मिळाले. ते मिळणारही नाहीत, असंही ते म्हणाले.

    Narayan Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena During Jan Ashirwad yatra Press in Ratnagiri

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार