• Download App
    नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना सुनावले|Nanabhau should have intellectual and ideological height along with physical height, Devendra Fadnavis told Nana Patole

    नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना सुनावले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नानाभाऊ शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सुनावले आहे.Nanabhau should have intellectual and ideological height along with physical height, Devendra Fadnavis told Nana Patole

    ‘मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो’ असे विधान नाना पटोले यांनी केले होते. त्यावरून पटोले यांच्यावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, नाना यांना शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी लागते. तसेच काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतक्या रसातळाला गेला आहे का? असा संतप्त सवालही फडणवीसांनी यावेळी विचारला आहे.



    पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो.

    त्यामुळे काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन?

    भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारसभेत बोलताना पटोले यांनी आपण पंतप्रधान मोदी यांना मारू ही शकतो व शिव्याही देऊ शकतो असे विधान केले. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

    लोकसभा निवडणुकीत पराभव आल्यानंतर नाना पटोले हे 2019 मध्ये साकोली विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परिणय फुके यांच्या प्रचारासाठी साकोली येथे आले होते.

    Nanabhau should have intellectual and ideological height along with physical height, Devendra Fadnavis told Nana Patole

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!