प्रतिनिधी
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ मंत्री उपस्थित नव्हता. या मुद्द्यावरून काँग्रेसवर सोशल मीडिया मध्ये जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.Nana Patole’s support for Ram Kadam’s role !!
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठा खुलासा केला आहे. लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवतीर्थावर व्हावे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
लतादीदींच्या स्मारकाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आमने-सामने आल्याचे दिसत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे आमदार राम कदम यांची भूमिका उचलून धरल्याचे दिसत आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लतादीदींचे शिवतीर्थावरच स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. मात्रप्रतिनिधी
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी काँग्रेसचा कोणताही वरिष्ठ मंत्री उपस्थित नव्हता. या मुद्द्यावरून काँग्रेसवर सोशल मीडिया मध्ये जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक मोठा खुलासा केला आहे. लतादीदींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक शिवतीर्थावर व्हावे, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.
लतादीदींच्या स्मारकाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आमने-सामने आल्याचे दिसत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे आमदार राम कदम यांची भूमिका उचलून धरल्याचे दिसत आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लतादीदींचे शिवतीर्थावरच स्मारक उभारण्याची मागणी केली आहे. मात्र लतादीदींचे स्मारक उभारणे सोपे नाही. त्यासाठी देशाने विचार करावा लागेल, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी करून एक प्रकारे आमदार राम कदम यांच्या भूमिकेला छेद दिल्याचे मानण्यात येत आहे.
परंतु आता महाविकास आघाडीतील तिसरा घटक पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला छेद देऊन लतादीदींचे स्मारक शिवतीर्थावर व्हावे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असावे. लतिदीदींच्या गोड आवाजाचे स्मरण त्यातून व्हावे. देश-विदेशातील संगीतप्रेमींसाठी त्यातून प्रेरणा मिळावी, असे वक्तव्य केले आहे.
यामुळे लतादीदींच्या स्मारकावर शिवसेना-भाजप हे आमने-सामने आलेले दिसत असले तरी महाविकास आघाडीत तिसरा महत्त्वाचा घटक पक्ष काँग्रेस या बाबतीत तरी भाजपच्या बाजूने दिसत आहे.
लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते कारण बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण अमित देशमुख हे मंत्री कोरूना बाधित आहेत तर वर्षा गायकवाड आणि असलम शेख हे मंत्री मुंबईबाहेर होते तसेच आपल्या बहिणीच्या सासुबाई वारल्यामुळे आपण तिकडे होतो असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे. लतादीदींचे स्मारक उभारणे सोपे नाही. त्यासाठी देशाने विचार करावा लागेल, असे वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी करून एक प्रकारे आमदार राम कदम यांच्या भूमिकेला छेद दिल्याचे मानण्यात येत आहे.
परंतु आता महाविकास आघाडीतील तिसरा घटक पक्ष काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेला छेद देऊन लतादीदींचे स्मारक शिवतीर्थावर व्हावे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक असावे. लतिदीदींच्या गोड आवाजाचे स्मरण त्यातून व्हावे. देश-विदेशातील संगीतप्रेमींसाठी त्यातून प्रेरणा मिळावी, असे वक्तव्य केले आहे.
यामुळे लतादीदींच्या स्मारकावर शिवसेना-भाजप हे आमने-सामने आलेले दिसत असले तरी महाविकास आघाडीत तिसरा महत्त्वाचा घटक पक्ष काँग्रेस या बाबतीत तरी भाजपच्या बाजूने दिसत आहे.
लतादीदींच्या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित नव्हते कारण बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण अमित देशमुख हे मंत्री कोरूना बाधित आहेत तर वर्षा गायकवाड आणि असलम शेख हे मंत्री मुंबईबाहेर होते तसेच आपल्या बहिणीच्या सासुबाई वारल्यामुळे आपण तिकडे होतो असा खुलासा नाना पटोले यांनी केला आहे.
Nana Patole’s support for Ram Kadam’s role !!
महत्त्वाच्या बातम्या
- मार्क झुकेरबर्ग संकटात : फेसबुक आणि इंस्टाग्राम लवकरच बंद होणार?, डेटा ट्रान्सफर सुविधेच्या अटीमुळे गोची
- केरळच्या महिलेने जिंकली कोट्यवधी रुपयांची लॉटरी; तब्बल ४४.७५ कोटींचा मिळाला फायदा
- कोकणातील दशावतारी नाट्यक्षेत्राचा आधारस्तंभ हरपला; सुधीर कलिंगण यांचे आजाराने निधन
- हुंडाईच्या पाकिस्तानी शाखेची मस्ती, स्वतंत्र काश्मीरचा पुरस्कार!! #Boycott hudai ट्रेंडनंतर हुंडाईच्या भारत शाखेकडून पाकिस्तानी शाखेचा निषेध!!
- भारताने वेस्ट इंडिजला पहिल्या वन डे सामन्यात नामविले; एक हजारावा सामना पडला पदरात