• Download App
    महाविकास आघाडीतून गेले "बिभीषण"; नानांनी पवार - सुप्रियांना ठरवले "रावण"!! |Nana patole names ajit pawar as "bibhishan", but pinched sharad pawar and supriya sule as "Ravan"!!

    महाविकास आघाडीतून गेले “बिभीषण”; नानांनी पवार – सुप्रियांना ठरवले “रावण”!!

    प्रतिनिधी

    मुंबई : अजितदादांच्या बंडखोरी नंतर काल राहुल गांधींनी राजधानी नवी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या गोटात “वेगळा आनंद” आहे. तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यांमधून समोर आला आहे. मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी बाकीच्या नेत्यांना बाजूला केले असावे, असे वक्तव्य करून पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या जखमेवर मीठ चोळले, तर नाना पटोले यांनी अजितदादांना “बिभीषण” म्हणून शरद पवार सुप्रिया सुळे यांना “रावण” ठरविले.Nana patole names ajit pawar as “bibhishan”, but pinched sharad pawar and supriya sule as “Ravan”!!

    अजितदादांच्या बंडखोरीतून काँग्रेस अशा पद्धतीने “वेगळा आनंद” साजरा करत आहे. नाना पटोले यांनी तर थेट रामायणकाळात जात अजितदादा म्हणजे “बिभीषण” होते. ते महाविकास आघाडीतून बाहेर गेले हे बरेच झाले, असे मत नोंदविले. अजितदादांना नानांनी “बिभीषण” म्हटल्यामुळे शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे “रावण” ठरतात, हे राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे का??, हा सवाल त्यामुळे तयार झाला आहे.



    काँग्रेसच्या प्रदेश कोअर समितीची बैठक गुरुवारी झाली. त्यात ते म्हणाले की, काँग्रेसबद्दल भाजप जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा सुरू असतानाही अशाच बातम्या पेरल्या होत्या, आताही अफवा पसरवल्या जात आहेत. पण काँग्रेस पक्षाचा एकही आमदार फुटणार नाही. सर्वजण एकजुटीने काम करत आहेत. महाविकास आघाडीतून “बिभीषण प्रवृत्ती” गेली ते बरेच झाले.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटल्यानंतर आता काँग्रेसचे पण २० आमदार फुटणार आहेत ही बातमी निराधार आहे. भाजपला पराभवाची भीती सतावू लागल्याने तो दडपशाही करून दुसरे पक्ष फोडतो आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घाणेरडे राजकारण सुरू आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांची भीती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे. भाजपच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प काँग्रेसने केला आहे, अशी माहिती पटोले यांनी दिली.

    दादा गेले, आघाडी आणखी बळकट

    बाळासाहेब थोरात या वेळी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे. विधानसभेत आम्ही एकत्रितपणे आणखी चांगले काम करू. पण राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. जनता भाजपला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल.

    Nana patole names ajit pawar as “bibhishan”, but pinched sharad pawar and supriya sule as “Ravan”!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    काँग्रेसचे नेते कलमाडींना पुन्हा पक्षाच्या “सेवेत” आणू पाहताहेत, पण या नेत्यांनी गेल्या 15 वर्षांत पुण्यात केले काय??

    Sharad Pawar : पंढरपूरच्या शेतकऱ्याची शेती क्रांती, 3 किलोच्या आंब्याला शरद पवारांचे नाव!!

    Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!