Thursday, 8 May 2025
  • Download App
    माझी कन्या भाग्यश्री योजना , २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरणास मान्यता , यशोमती ठाकूर यांनी दिली ' ही ' माहितीMy daughter Bhagyashree Yojana, approval for disbursement of Rs.8 crore 50 lakhs,This information was given by Yashomati Thakur

    माझी कन्या भाग्यश्री योजना , २०२१-२२ आर्थिक वर्षासाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरणास मान्यता , यशोमती ठाकूर यांनी दिली ‘ ही ‘ माहिती

    माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषखालील कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी कायम ठेवली आहे.My daughter Bhagyashree Yojana, approval for disbursement of Rs.8 crore 50 lakhs,This information was given by Yashomati Thakur


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माझी कन्या भाग्यश्री या नवीन योजनेमध्ये सध्या सुरू असलेली सुकन्या योजना विलीन करण्यात आलेली आहे.माझी कन्या भाग्यश्री योजना संपूर्ण राज्यात सर्व गटातील दारिद्र्य रेषखालील कुटुंबात जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी कायम ठेवली आहे.त्या व्यतिरिक्त मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

    या योजनेसंदर्भात माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी माहिती दिली आहे की ,माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे.या योजने बाबतची संपूर्ण www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

    माझी कन्या भाग्यश्री ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी लागू करण्यात आली आहे.



    माझी कन्या भाग्यश्री योजनेची उद्दिष्ट पुढीलप्रमाणे

    १) महाराष्ट्रात मुलींचे शिक्षण व आरोग्यामध्ये सुधारणा करणे
    २) मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे
    ३) मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे
    ४) बालिका भ्रूणहत्या रोखणे
    ५) बालविवाह रोखणे
    ६) मुलांप्रमाणेच मुलींचा सुद्धा आदर करणे

    माझी कन्या भाग्यश्री योजना लाभार्थी पात्रता

    १)जर एखाद्या पलकास एकुलती एक मुलगी असेल आणि मातेने कुटुंब नियोजन केले असेल , तर ती मुलगी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे.
    २) जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर अशा परिस्थितीत लाभास पात्र राहणार नाही.

    आवश्यक कागदपत्रे

    १) लाभार्थ्यांचे आधार कार्ड
    २) उत्पन्न प्रमाणपत्र
    ३)रहिवाशी पत्ता पुरावा
    ४) मोबाईल नंबर
    ५) पासपोर्ट आकाराचा फोटो
    ६) आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

    My daughter Bhagyashree Yojana, approval for disbursement of Rs.8 crore 50 lakhs,This information was given by Yashomati Thakur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार

    Devendra Fadnavis स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढविण्याचे महायुतीचे धोरण, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

    Icon News Hub