• Download App
    ध्वनीक्षेपकाबाबत कायदा पाळण्याचा मुस्लीम संघटनांचा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची बैठक|Muslim organizations redy to enforce the law on loudspeakers

    ध्वनीक्षेपकाबाबत कायदा पाळण्याचा मुस्लीम संघटनांचा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची बैठक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्याबाबत , आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना याबाबतच्या अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन- मदत करण्याची आमची भूमिका आहे, असा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची बैठकीत उमटला. Muslim organizations redy to enforce the law on loudspeakers

    अवामी महाझ ‘ सामाजिक संघटनेने ही बैठक बोलवली होती. आझम कॅम्पस येथे ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी अवामी महाजचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार होते.रिपब्लिकन पक्षाचे अॅड. अयूब शेख,नुरुद्दीन सोमजी, अॅड. शेरकर, अवामी महाझ सामाजिक संघटनेचे सचिव वाहिद बियाबानी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. इक्बाल शेख,मशकूर शेख, इक्बाल अन्सारी, मुश्ताक पठाण,अंजुम इनामदार, इक्बाल तांबोळी,असलम बागवान यांच्यासह अनेक प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते.



    जिल्हाधिकारी कार्यालयात जनसंपर्क अधिकाऱ्याकडे हे अर्ज देण्याची सुविधा आहे. वक्फ बोर्डाचे प्रमाणपत्र जोडावे, असे अॅड. अयूब शेख यांनी सांगितले.आवाजाची मर्यादा प्रमाणात ठेवण्याबाबत कायद्याच्या तरतूदी प्रमाण मानल्या जातील, असे अनेक प्रतिनिधींनी सांगीतले.

    डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘ पुण्यातील ५०० मशिदींना आम्ही ध्वनीक्षेपक परवानगी संबंधी अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी परवानगी आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे. इतर धर्माच्या धर्म स्थळांना देखील ध्वनीक्षेपक परवानगीसाठी कायदेशीर प्रक्रियेत मदत करू. निवडणूका असल्या मुळे त्या पार्श्वभूमीवर काही मुद्दे पुढे आणले जात असले शांतता, सुव्यवस्था राखली जावी, अशी आमची भूमिका आहे.तीच सर्वांची भूमिका असली पाहिजे. पुणे शहर, महाराष्ट्र राज्य शांतताप्रिय आहे आणि राहील.’

    Muslim organizations redy to enforce the law on loudspeakers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस