• Download App
    धर्मांतरप्रकरणी यूपीतील मौलवींच्या अटकेविरोधात मुस्लिम संघटनांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन । Muslim organisations hold protest in pune against arrest of Maulavi in UP In Religion Conversion Case

    धर्मांतरप्रकरणी यूपीतील मौलवींच्या अटकेविरोधात मुस्लिम संघटनांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, आरोप हटवून सोडण्याची मागणी!

    Muslim organisations hold protest in pune against arrest of Maulavi in UP In Religion Conversion Case

    Muslim organisations  : उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने मौलाना कलीम सिद्दिकी, मौलाना उमर गौतम आणि मुफ्ती जहांगीर यांना अटक केल्यानंतर आता निदर्शने सुरू झाली आहेत. पुण्यातील अनेक मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘कुल जमात तंझीम’ या गटाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निषेध केला. Muslim organisations hold protest in pune against arrest of Maulavi in UP In Religion Conversion Case


    प्रतिनिधी

    पुणे : उत्तर प्रदेश पोलीस आणि राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने मौलाना कलीम सिद्दिकी, मौलाना उमर गौतम आणि मुफ्ती जहांगीर यांना अटक केल्यानंतर आता निदर्शने सुरू झाली आहेत. पुण्यातील अनेक मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘कुल जमात तंझीम’ या गटाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र निषेध केला.

    या आंदोलनात सहभागी झालेल्या संघटनांमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम कौन्सिल, जमात-ए-इस्लामी-ए-हिंद, द मुस्लिम फाउंडेशन, जमीयत उलेमा-ए-हिंद आणि सीरेट कमिटी यांचा समावेश होता. या सर्व संघटनांनी आरोप केला की, मुस्लिम मौलवींवर लावण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित आहेत आणि ते तत्काळ मागे घ्यावेत. संघटनांनी म्हटले आहे की, ही अटक लोकशाहीविरोधी आणि असंवैधानिक आहे.

    ‘देशाला कमकुवत करण्याचे षडयंत्र’

    संघटनांनी म्हटले की, मुस्लिम नेते आणि विशेषतः मौलवींना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेचे वर्तन अतिशय धोकादायक आहे. ते म्हणाले की, देशाला कमकुवत करण्याचे हे षडयंत्र आहे. मौलाना कलीम सिद्दीकीच्या अटकेचे कारण उद्देश उत्तर प्रदेश सरकारचे उजव्या विचारसरणीचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला. इस्लामचे विद्वान आणि मौलवींना लक्ष्य करण्याशिवाय यात दुसरे काही नाही.

    तन्झीमचे संयोजक जाहिद शेख म्हणाले की, अवैध पैसे आणि धर्मांतराच्या आरोपांमध्ये सत्याचा कोणताही पुरावा नाही. दुसरीकडे तन्झीमचे अझहर तांबोळी म्हणाले की, अटक केलेल्यांवरील आरोप हटवून त्यांना ताबडतोब सोडण्यात यावे, अशी मागणी करत सर्वांनी मिळून जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन सादर केले आहे.

    Muslim organisations hold protest in pune against arrest of Maulavi in UP In Religion Conversion Case

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Terrorist : पूंछमध्ये सुरक्षा दलांच्या धडाकेबाज कारवाईत दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त

    एअर चीफ मार्शलनंतर आता पंतप्रधान मोदींशी संरक्षण सचिवांची भेट

    NIA uncovers : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मूळ मास्टरमाइंड NIAने काढला शोधून