• Download App
    मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन|Mumbai-Pune in one and half hour and Nagpur-Mumbai distance in six hours, bullet train to run on high speed railway corridor

    मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई ते पुणे हे अंतर दीड तासात तर मुंबहू-नागपूर अंतर सहा तासांत पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची योजन आखली जात आहे. त्यासाठीचे सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे.Mumbai-Pune in one and half hour and Nagpur-Mumbai distance in six hours, bullet train to run on high speed railway corridor

    महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड या रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त उपक्रमातून प्रमुख शहरांदरम्यान सेमी हायस्पीड ट्रेन कॉरिडॉरची योजना आखली जात आहे. प्राथमिक टप्प्यावर असलेल्या योजनेची व्यवहार्यता तपसाली जात आहे.



    मुंबई ते नागपूर प्रवासासाठी सध्या १२ तास लागतात. हाय स्पिीड कॉरिडॉरमुळे हा वेळ सहा तासांपर्यंत कमी होईल. या प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जाईल.नागपूर-मुंबई दरम्यान होत असलेल्या समृद्धी महामागार्ला लागूनच हा बुलेट ट्रेनचा मार्ग होणार आहे. ७३६ किमीच्या या मागार्साठीचे सर्वेक्षण १२ मार्च रोजी मुंबईतून सुरू झाले आहे.

    सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण सुरू असून विशेष विमानात अत्याधुनिक यंत्रणा बसवून त्याद्वारे हे काम सुरू आहे. या आधुनिक पद्धतीत विमानातून प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या दीडशे मीटर परिसरातील चित्रीकरण केले जाणार आहे. यासाठी १०० मेगापिक्सलचा कॅमेरा विमानाला लावण्यात आला आहे.

    हे काम झाल्यानंतर या प्रकल्पाचा थ्रीडी नकाशा तयार केला जाईल. त्यामुळे प्रस्तावित मार्गाच्या आजुबाजूला असलेली झाडे, टेकड्या, नद्या, तलाव, इमारती यांची लांबी-रूंदी या नकाशातून नेमकी समजू शकणार आहे. हा मार्ग झाल्यानंतर नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा, मालेगाव, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर ही शहरे या रेल्वे मागार्ने जोडली जाणार आहेत.

    Mumbai-Pune in one and half hour and Nagpur-Mumbai distance in six hours, bullet train to run on high speed railway corridor

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस