• Download App
    एनसीबीने टाकलेल्‍या छाप्यात कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्‍त - पुण्यात मंगळवारी रात्री उशिरा केली होती गोपनीय कारवाई|Mumbai Narcotics control Department raided two places in pune city

    एनसीबीने टाकलेल्‍या छाप्यात कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्‍त – पुण्यात मंगळवारी रात्री उशिरा केली होती गोपनीय कारवाई

    मुंबई नार्कोटीक्‍स कन्ट्रोल ब्यूरोने मंगळवारी पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई करत कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्‍त केले आहे.


    प्रतिनिधी 

    पुणे -नार्कोटीक्‍स कन्ट्रोल ब्यूरोने मंगळवारी पुण्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून कारवाई करत कोट्यवधींचे अंमली पदार्थ जप्‍त केले. या दोन वेगवेगळ्या छाप्यात मुंबई एनसीबीने दोन वेगवेगळे गुन्‍हे दाखल केले आहेत. याप्रकरणात काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याची माहिती मुंबई एनसीबीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.Mumbai Narcotics control Department raided two places in pune city

    एनसीबीची अमंली पदार्थ आणि ड्रग्न पेडलर्स विरोधात वारंवार कारवाई सुरू आहे. पुण्यातील वेगेवगेर्ळ्या छाप्यात दाखल करण्यात आले. या दोन्‍ही गुन्‍ह्यात एलएसडीचे 52 ब्लॉट्स, 198 ग्रॅम चरस, 5 ग्रॅम कोकीन जप्‍त करताना तीन जणांना ताब्यात घेतले आहे. आंतराष्ट्री बाजारात जप्‍त करण्यात आलेल्‍या अंमली पदार्थाची किंमत लाखो रूपयांची आहे.



    पहिल्‍या घटनेत एनसीबीने विविध ठिकाणी टाकलेल्‍या छाप्यात 123 ग्रॅम चरस आण 5 ग्रॅम कोकेन जप्‍त करताना दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या घटनेत एनसीबीने छापे टाकून 52 ब्लॉट एलसीडी आणि 75 ग्रॅम चरस जप्‍त करताना एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्‍ह्याचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक बिजेंद्र चौधरी करीत आहेत.

    Mumbai Narcotics control Department raided two places in pune city

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    मराठा आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्या‌ राजकीय पक्षांचे होईल मोठे नुकसान; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा!!

    Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले- जरांगे चर्चेसाठी तयार असतील, तर सरकारही तयार; दोन्हीही बाजूंनी समन्वय आवश्यक