मुंबईतील लोअर परेल परिसरातील 60 मजली निवासी इमारतीत भीषण आग लागली. इमारतीत लागलेल्या आगीत जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबई अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने इमारतीच्या 19व्या मजल्यावरून उडी मारली. बचावकार्य सुरू आहे. Mumbai Level 3 fire broke out at Avighna park apartment, Curry Road around 12 noon today, one death
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतील लोअर परेल परिसरातील 60 मजली निवासी इमारतीत भीषण आग लागली. इमारतीत लागलेल्या आगीत जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबई अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने इमारतीच्या 19व्या मजल्यावरून उडी मारली. बचावकार्य सुरू आहे.
अग्निशमन दलाची टीम आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अग्निशामक दलाच्या 20 हून अधिक गाड्या आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील करी रोडवरील बहुमजली अविघ्न पार्क अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीत एक व्यक्ती जखमी झाला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एकाचा जणाचा बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आहे. आग आणि धुरामुळे ही व्यक्ती 19व्या मजल्यावरील बाल्कनीला लटकली होती.
19 व्या मजल्यावर आग
असे सांगितले जात आहे की, इमारत 60 मजली आहे आणि आग 19व्या मजल्यावर लागली. व्हिडिओमध्ये इमारतीमध्ये आग आणि धुराचे लोट उठताना दिसत आहेत. त्याचवेळी एक व्यक्ती इमारतीतून खाली पडल्यानंतर मोठी आरडाओरड झाली. यानंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याचा मृत्यू झाला. मुंबई अग्निशमन विभागाने ही माहिती दिली.
Mumbai Level 3 fire broke out at Avighna park apartment, Curry Road around 12 noon today, one death
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा बाप काढला; अजितदादा म्हणाले “नो कॉमेंट्स”
- चिथावणीखोर भाषणे; जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमामचा जामीन अर्ज साकेत कोर्टाने फेटाळला
- महाराष्ट्रात देशाच्या १२ टक्के लसीकरण!,ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन
- ‘लसीकरण मोहिमेवर व्हीआयपी संस्कृतीचा दबदबा नव्हता’, पंतप्रधान मोदींच्या राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणातील टॉप 10 मुद्दे
- पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
- ‘जनतेसोबत घृणास्पद विनोद सुरू आहे’, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल