• Download App
    Mumbai Landslide : त्या ठिकाणच्या लोकांना तीन-तीन जाऊन सांगितलं होतं... दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया । Mumbai Landslide Mayor Kishori Pednekar Comment On 22 died in wall collapse in chembur and Vikhroli

    Mumbai Landslide : त्या ठिकाणच्या लोकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगितलं होतं… दुर्घटनेवर महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

    Mumbai Landslide : मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेमध्ये दोन्ही ठिकाणी मिळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येक दोन लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना मोफत उपचारांची घोषणा केली आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनीही घटनेवर दु:ख व्यक्त करत त्या ठिकाणच्या लोकांना महापालिका अधिकऱ्यांनी आधी तीन वेळा इशारा दिल्याचे सांगितले. Mumbai Landslide Mayor Kishori Pednekar Comment On 22 died in wall collapse in chembur and Vikhroli


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी भागात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या. या दुर्घटनेमध्ये दोन्ही ठिकाणी मिळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येक दोन लाख व जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दुर्घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमींना मोफत उपचारांची घोषणा केली आहे. मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनीही घटनेवर दु:ख व्यक्त करत त्या ठिकाणच्या लोकांना महापालिका अधिकऱ्यांनी आधी तीन वेळा इशारा दिल्याचे सांगितले.

    ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला प्रतिक्रियाा देताना महापौर म्हणाल्या की, महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तीन-तीन वेळा जाऊनही लोक बाहेर निघायला तयार होत नाहीत. मग अशावेळी महापालिका किंवा एखादी यंत्रणा कारवाई करायला जाते त्यावेळी त्याला विरोध होतो. चेंबूरमधील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हेच सांगितलं. त्य ाठिकाणच्या नागरिकांना तीन-तीन वेळा जाऊन सांगण्यात आलं होतं. तुमची घरं दरडीच्या खालीच आहेत, असंही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं,” असं त्या म्हणाल्या.

    पुढे त्या म्हणाल्या की, पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेऊन किमान पावसाळ्यात तरी दुसरीकडे चला असं सांगण्यात आलं होतं. इतर ठिकाणीही लोकांना दरवर्षी दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं. त्यामुळे स्वतः जीव वाचवण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेतली पाहिजे. घडलेली घटना वेदनादायी आहे, पण नागरिकांनी महापालिकेला सहकार्य केलं पाहिजे,” असंदेखील त्या म्हणाल्या. कोसळत आहे.

    Mumbai Landslide Mayor Kishori Pednekar Comment On 22 died in wall collapse in chembur and Vikhroli

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य