या आरोपींनी ७० ते ७५ जणांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करत ही लिंक कुठवर गेली आहे याचा शोध घेत आहेत. Mumbai: Fake corona vaccination certificate obtained without vaccination for Rs 1,500, two accused arrested
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोविड-१९ लसीकरणाची नोंदणी व प्रमाणपत्राची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा १० च्या पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची सहाद साजीक शेख (२१) आणि माविया अब्दुल हक भरणिया (२१) अशी नावे आहेत.
हे आरोपी लसीकरण न झालेल्या नागरिकांची १५०० रुपये घेऊन लस घेतल्याची अधिकृत नोंद करत होते. या नोंदणीचे प्रमाणपत्र देखील नागरिकांना देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. दरम्यान या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
या आरोपींनी ७० ते ७५ जणांना बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. दरम्यान पोलीस या आरोपींकडून अधिक तपास करत ही लिंक कुठवर गेली आहे याचा शोध घेत आहेत.तसेच हे आरोपी गुजरात राज्यातून रॅकेट चालवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप, प्रिंटर मशीन आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
Mumbai: Fake corona vaccination certificate obtained without vaccination for Rs 1,500, two accused arrested
महत्त्वाच्या बातम्या
- साताऱ्यात संतापजनक घटना , गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
- माजी संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत यांच्या बंधूंचा भाजपमध्ये प्रवेश, उत्तराखंडमध्ये विधानस
- लहान मुलांच्या कार्यक्रमात पंतप्रधानांची खिल्ली, तामीळ चॅनलला बजावली नोटीस
- नितीन गडकरी बनले इन्स्टाग्राम स्टार, अनोख्या शैलीत किस्सा सांगितलेला व्हिडीओ व्हायरल
- भगौडा विजय मल्या लंडनमध्ये होणार बेघर, आलिशान घर बॅँक करणार जप्त